spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Skin Care Tips थंडीमध्ये त्वचेवर ग्लो पाहिजे, तर ‘या’ टिप्सचा करा वापर

winter beauty tips : सुंदर आणि नितळ त्वचा कोणाला आवडत नाही असे नाही, सर्वाना आवडते. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यास चेहरा सुंदर दिसत नाही, आपली त्वचा सुंदर आणि नितळ दिसण्यासाठी आपण अनेक सौंदर्य उत्पादने (beauty products) चा वापर करत असतो तरीही देखील आपली त्वचा सुंदर होत नाही आणि त्वचेवर ग्लो देखील येत नाही. त्वचेची निगा राखणे फार गरजेचे आहे.

थंडीच्या दिवसात त्वचा संभंधित अनेक समस्या उद्भवत असतात, मात्र त्वचा कोरडी होण्याची समस्या जास्त जाणवते, त्यासाठी तुम्ही त्वचेला ग्लिसरीन लावू शकता. त्वचेसाठी ग्लिसरीनचे अनेक फायदे आहेत. त्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचे काही थेंब हातात घेऊन प्रभावित जागेवर लावू शकता. जर तुम्ही चेहऱ्यावर ग्लिसरीन लावण्याचा विचार करत आहात तर तुम्ही ग्लिसरीनमध्ये पाणी मिक्सकरून लावा. तसेच ग्लिसरीन (Glycerin) मध्ये गुलाबजल (rose water) मिक्स करून घेणे आणि हे मिश्रण त्वचेला लावणे.

 

थंडीच्या दिवसात तुम्ही त्वचेला कोरफड सोबत ग्लिसरीन मिक्स करून घेणे आणि त्वचेला लावणे असे केल्याने त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते. त्यासाठी एक चमचा एलोवेरा जेल घ्या आणि त्या मध्ये ग्लिसरीन मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण त्वचेला लावून घ्या. असे केल्यास त्वचेला ग्लो येईल, आणि अनेक फायदे देखील जाणवतील.

थंडीमध्ये त्वचा चमकदार बनवण्यासाठी लिंबू हा चांगला पर्याय आहे. कारण लिंबामध्ये Vitamin C आढळून येते. लिंबामध्ये जर तुम्ही ग्लिसरीन मिक्स केल्यास कोरड्या त्वचेपासून आराम मिळण्यास मदत होईल, त्यासाठी एक चमचा लिंबाचा रस घेणे आणि एक चमचा ग्लिसरीन घेणे हे दोन्ही मिश्रण मिक्स करून घेणे आणि त्वचेला लावणे. असे केल्यास अनेक फायदे होतील.

गुलाबजलमध्ये ग्लिसरीन मिक्स केल्याने आणि ते त्वचेला लावल्यास अनेक फायदे होतील. असे केल्याने त्वचेमधील ओलावा टिकून राहतो आणि कोरडे पणाची समस्या दूर होण्यास मदत होते. पण हे कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

 

 

Latest Posts

Don't Miss