spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज राज्य सरकार मांडणार ठराव

Maharashtra Assembly Winter Session : काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Karnataka Maharashtra Border Dispute) चांगलाच पेटल्याचं दिसून येत आहे. तर महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचं काम करत आहे. तर काल विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं मौन का ? असं प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला. त्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ सुद्धा पहिला मिळाला. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली. सीमाप्रश्नाबाबत विधिमंडळात मंगळवारी ठराव मांडणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.

सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने विधिमंडळात केलेल्या ठरावाला जशास तसे उत्तर देणारा ठराव विधिमंडळात मंजूर करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, कर्नाटक विधानसभा (Karnataka Legislative Assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील भाजप सरकारने सीमाभागाचा विषय चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शिंदे-फडणवीस सरकारने मौन बाळगले होते. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष्य केले. भाजपच्या सबुरीच्या भूमिकेमुळे गेल्या आठवडय़ात हा ठराव विधिमंडळात मांडण्यात आलेला नाही, असे समजते. त्यामुळे सीमाप्रश्नावर सभागृहात ठराव आणून शिंदे- फडणवीसांची (Shinde- Fadnavis) कोंडी करण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली होती. त्यानुसार सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या, तर परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून विरोधकांनी हा विषय उपस्थित केला.

सीमाप्रश्नावर सरकार बघ्याची भूमिका घेत असून, विधिमंडळात ठराव आणण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. तसेच या मुद्यावरून कामकाज रोखण्याचा इशारा विरोधकांनी दिला. त्यावर सीमाप्रश्नावर राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोणत्याही स्थितीत महाराष्ट्र सीमावासीयांच्या मागे उभा राहील, असे नमूद करीत मंगळवारी या विषयावर दोन्ही सभागृहांत ठराव मांडण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

हे ही वाचा : 

Happy Brithday Salman Khan तुम्हाला सलमान खानच्या लग्नाचे कारण माहित आहे का ? घ्या जाणून

Skin Care Tips थंडीमध्ये त्वचेवर ग्लो पाहिजे, तर ‘या’ टिप्सचा करा वापर

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss