Happy Birthday Salman Khan : सलमान खानने (salman khan) आजवर सिनेसृष्टीत (bollywood) आपला ठसा उमटवलेला आहे. त्याचे अनेक चित्रपट आजही चाहत्यांना भुरळ टाकतात. मेने प्यार किया, हम साथ साथ हे, राधे, दबंग, बजरंगी भाईजान, टाइगर असे त्याचे कितेक चित्रपट ब्लॉक बस्टर ठरलेले आहेत. सलमानचा मोठा चाहता वर्ग आहे. अश्या दबंग (dabang ) स्टारचा आज वाढदिवस आहे. सलमान खान ५७ वा वाढदिवस (Happy Birthday Salman Khan) साजरा करत आहे. सलमान खानने वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील मित्रमंडळीसाठी त्याच्या बहिणीच्या घरी एका जंगी बर्थडे पार्टीचे आयोजन केलं होतं.
View this post on Instagram
सलमान खानने आयोजित केलेल्या या पार्टी (party )मध्ये शाहरुख खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, पुलकित सम्राट, कृती खरबंदा, पूजा हेगडे अश्या सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमानच्या बर्थडे पार्टीमध्ये शाहरुख खानला (sharukh khan) बघून त्याचे चाहते चकित झाले. दोघांन एकत्र येण्याच्या बातमीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान ब्लॅक लूकमध्ये (black look)दिसून आला. सलमानच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील (bollywood stars) कलाकार मंडळी तसेच सलमानचे चाहते यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच कित्येकानी त्याला भेटून शुभेच्छा दिल्या. सलमानचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत. भाईजानने वाढदिवसाचा केक कट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहते, मित्रमंडळी आणि सेलिब्रिटींच्या (celebrity) उपस्थितीत सलमानने केक (cake ) कट केला आहे.
हे ही वाचा:
हिंदी चित्रपटांत केलं जातंय मराठमोळ्या Siddharth Jadhavचं कौतुक
Cold Wave पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र थंडी तर दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात दाटले दाट धुके