spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बेळगाव सीमा प्रश्नाबाबतचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

आजचा अधिवेशनाचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटक विरोधात एक मतांनी ठराव मंजूर केला आहे. या ठरावमध्ये विरोधी पक्षाने सुद्धा एक मताने मजूर करण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आठवडाभर सावध भूमिका घेणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारने अखेर कर्नाटक सीमाप्रश्नी विधानभवनात ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ठरावाचे वाचन केले. सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने विधिमंडळात केलेल्या ठरावाला जशास तसे उत्तर देणारा ठराव विधिमंडळात मंजूर करण्याची घोषणा सरकारने केली होती.

त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांनी ठराव एक मतांनी एक मतांनी मजूर केल्या बदल सभागृहाचे आभार मानले. सांस्कृतिक आणि शैक्षणिक मदत जाहीर केली आहे.

 कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंचन् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठरावा आज विधानसभेत एकमताने मंजूर (Maharashtra Assembly Winter Session Resolution) करण्यात आला. महाराष्ट्राच्या विधानसभेत अखेर बेळगाव सीमा प्रश्नी ठराव (Belgaum) एकमताने मंजूर करण्यात आला. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्राच्या विधानसभेने कर्नाटक प्रशासनाच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

राज्य सरकारने सादर केलेल्या ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दुरुस्ती सूचना केल्या ठरावात बेळगाव, निपाणी, भीदर या शहरांचा उल्लेख ठरावात आवर्जून करण्याची मागणी त्यांनी केली. ठराव हा आगामी काळात कायदेशीर लढाईतही महत्त्वाचा ठरू शकतो, याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी ही सूचना केली. त्याशिवाय, या ठरावातील वाक्यरचना, व्याकरण दुरूस्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या सूचनांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : 

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजाची हक्कालपट्टी, दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss