spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य 15 जुलै 2022

मेष : स्वतःच्या विद्ववत्तेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आज किमती वस्तूची खरेदी करण्याचे योग संभवतात. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

वृषभ : कुटुंबासाठी वेळ दिल्याने नैराश्यातून दिल्याने बाहेर पडण्यास मदत होईल. घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च कराल. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल.

मिथुन : उत्तम पद्धतीने केलेले व्यवस्थापन जीवनाला नवीन वाटेवर घेऊन जाणारे ठरेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायद्याची राहील. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

कर्क : दूरचा प्रवास टाळणे आवश्यक आहे. केल्यास हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आजचा दिवस कामाच्या व्यस्ततेत जाणारा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील.

सिंह : आरोग्य विषयक तक्रारींवर रामबाण उपाय सापडेल. लॉटरी सारख्या विषयात केलेली गुंतवणूक नुकसानीचा सौदा ठरू शकेल. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करा. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे.

कन्या : कोणत्याही कारणासाठी करावा लागणारा खर्च आणि तुमची त्या व्यवहारातील भूमिका ही नुकसानीचा सौदा ठरू शकेल. धनाची बचत केली पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. नोकरीच्या बाबतीतील प्रत्येक घडामोडींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

तुळ : नोकरीतील वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमचा मानसिक तणाव वाढवू शकतो. कामावरील लक्ष विचलित होईल. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण तंट्याची आजच सोडवणूक करण्याची मानसिक तयारी ठेवा.

वृश्चिक : शारीरिक व्यायाम तसेच क्रीडा क्षेत्राविषयीची रुची वाढेल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपाचा फायदा विचारात घेऊन निर्णय करू नका. मधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. नियोजित कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात.

धनु : निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करु शकते. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे.

मकर : एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. भागीदारीतील प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. व्यावसायिकांना चांगला दिवस आहे .

कुंभ : क्रीडा प्रकार किंवा तत्सम कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यास व तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर ती खूपच फायदेशीर ठरेल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितल्यास तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदतगार ठरेल.

मीन : आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्न तारी अन्न मारी या युक्तीची आठवण ठेवल्या मोठी आपदा टळू शकेल. तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र चर्चा झाल्यास तुमचा प्रकल्प रखडेल.

– रविंद्र भगवान पाठक गुरुजी ठाणे ८१०८२६६६७२

Latest Posts

Don't Miss