spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात कुठे ऑरेंज आणि यलो अलर्ट

धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे पालघर, पुणे आणि सातारा येथे आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरात आज पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. ठीक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. आज पुन्हा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अधूनमधून 45-55 किमी प्रतितास वेगाने वाहणारे जोरदार वारे 65 किमी ताशी वाहण्याची शक्यता असण्याचा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिला आहे. राज्यात गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती वृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.

कुठे ऑरेंज आणि यलो अलर्ट ?
आजही धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे पालघर, पुणे आणि सातारा येथे आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात एनडीआरएफ ची टीम दाखल
महाराष्ट्रात पावसामुळे एकूण 14 NDRF टीम आणि 6 SDRF तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 99 वर पोहोचला आहे. तर 181 जनावरांचा आत्ता पर्यंत मृत्यू झाला आहे. 7,963 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

हेही वाचा :

पूर परिस्थितीचा आढावा घेत, जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केली खोचक टीका

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सर्व परिस्थितीचं मी बारकाईने निरीक्षण करत आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर आहोत. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss