spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray “साहेब तुम्ही बसा…” वसंत मोरेंच्या ‘त्या’ किस्स्याची पुण्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा

महापालिकेची निवडणूक (Municipal election) येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पुण्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी लक्ष केंद्रित केले आहे. संघटनात्मक बैठका, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे, जाहीर सभांच्या माध्यमातून राज ठाकरे राजकीय टीकाही करत आहेत. सद्या राज ठाकरे पुण्यात आहेत. पुण्यात (Pune News) ठाकरेंचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेच्या तीन कार्यालयांची उद्घाटनं राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आली. या उद्धाटनं कार्यक्रमाला मनसेचे नाराज नेते वसंत मोरे (Vasant More)हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, मोरेंनी यावेळी केलेलं वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : 

अजित पवार आज नागपुरातून तातडीने सरकारी विमानाने मुंबईकडे होणार रवाना

काय किस्सा घडला?

राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले. त्यावेळेस खुर्चीवर बसताना त्यांनी मिश्कील प्रश्न विचारला, “खुर्ची व्यवस्थित आहे ना?, मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती.” राज ठाकरेंच्या या प्रश्नावर वसंत मोरेंनी लगेचच उत्तर दिले. “चंद्रकांत पाटील यांची तुटली होती.” तसेच, “साहेब तुम्ही बसा, मी मागे आहेच…”, असं मोरेंनी राज ठाकरेंना म्हटलं. राज ठाकरेंनी पाठीमागे वळून पाहात वसंत मोरे यांच्यावर कटाक्ष टाकला. या प्रसंगाची आता पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. धायरी येथील कार्यलय उद्घाटन सोहळा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी ज्या वसंत मोरेंवर आहे, ते मोरे राज ठाकरेंच्या खुर्चीला धरुनच उभे दिसले. यावेळी एक किस्सा घडला.

CBSE बोर्डाकडून दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात गाईडलाईन्स जारी

”नवं काहीतरी’ आज राज ठाकरेंची व्याख्यानमाला

राज ठाकरे यांनी २०१९ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यात एकच सभा घेतली होती. त्यानंतर त्यांचे पुणेकरांसाठी जाहीर भाषण झालेले नाही. मनसेच्या वर्धापनदिनाच्या ९ मार्च २०२२ मधील मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले होते. राज ठाकरे यांचे मेळाव्यातून किंवा पक्षाच्या जाहीर सभांतून भाषणे झाली असली तरी ती राजकीय स्वरूपाची होती. दहा वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर आज सहजीवन व्याख्यानमालेत राज ठाकरे ”नवं काहीतरी”… या विषयावर आज बोलणार आहेत. त्यामुळे ते पक्षाच्या नवनिर्माणाबद्दल काय बोलणार, नेमकी कुठल्या प्रश्नांची उत्तरं देणार, त्यात कुणाला लक्ष्य करणार का की ‘इंजिना’च्या पुढील प्रवासाची दिशा सांगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2022 अधिवेशनाचा आज ८ वा दिवस, विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

Latest Posts

Don't Miss