spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१०वी पास धीरूभाई अंबानी अब्जो रुपयांच्या मालक

मेहेनत आणि चिकाटीने ५०० रुपयांचे रूपांतर केले करोडो,अब्जो रुपयात ,अशा दिवंगत धीरूभाई अंबानींचा आज वाढदिवस आहे. तुमचं काम हे नेहमी तुमचं समर्थन करत याचे उदाहरण म्हणजे धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानी जेव्ह गुजरात हुन महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ५०० रुपये होते. आपल्या मेहेनत आणि चिकाटीच्या बळावर ते रिलायन्स या अब्जोकोटी रुपयांच्या कंपनी चे मालक झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Ambani (@tinaambaniofficial)

धीरूभाईंचा जन्म गुजरातमधील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी २८ डिसेंबर १९३२ रोजी झाला. परिवार मोठा असल्याने त्यांना पैशांची चणचण भासत होती. १०वी शिक्षण झाल्यानंतर धीरूभाईनी व्यवसायाला सुरवात केली. त्यानंतर ते येने मध्ये कामासाठी गेले तिकडे त्यांनी काही वर्ष काम केले. येमेनमध्ये स्वतंत्र लढ्याची सुरवात झाली त्यामुळे तिकडे भारतीयांना व्यापार करण्यास निषेध केला . १९५० साली धीरूभाई भारतात आले भारतात त्यांनी काही वर्ष विविध क्षेत्रात काम केले, आणि अश्या प्रकारे भारतात त्यांच्या व्यवसायाला सुरवात केली.

त्यांचे विचार हि त्यांची ताकद होती. आजही त्यांचे विचार लोकांना प्रेणदायी ठरतात. त्यांच्या हृदयातील त्यांनी रिलायन्स कंपनी उभी केली. विविध क्षेत्रात तिचा विस्तार केला. वीज, खाद्य पदार्थ, कापड अश्या क्षेत्रात आजही रिलायन्स कंपनीचं मोठं नाव आहे. आज त्यांचा जन्म दिनानिमित्त नीता अंबानी यांनी इन्टाग्राम वर पोस्ट शेयर करून त्यांच्या आठवणीचे स्मरण केले. त्या म्हणाल्या ‘पप्पा तुझी खूप आठवण येते. पण जेव्हा मी माझे डोळे बंद करते , आपले विचार एकत्र करते आणि प्रेरणा शोधते , तेव्हा आपण तिथे असता , अप्रत्यक्षपणे! आठवणींसाठी आणि आम्‍हाला सर्वोत्‍तम असण्याच्या सक्षम करण्‍याच्‍या प्रेरणेबद्दल धन्यवाद.

हे ही वाचा:

CBSE बोर्डाकडून दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात गाईडलाईन्स जारी

Maharashtra Assembly Winter Session 2022 अधिवेशनाचा आज ८ वा दिवस, विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज होणार सुटका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss