spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

China Coronavirus अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे वाढले मृतदेहांचे खच, भयंकर दृश्य दाखणारा Video Viral

तब्बल दोन वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाच्या उद्रेकाचं केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

China Coronavirus : तब्बल दोन वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाच्या उद्रेकाचं केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कोट्यवधीच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याच वेळी, चीन संक्रमित आणि मृत्यूची संख्या लपवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे. दरम्यान, चीनमधून काही व्हिडीओ समोर आले आहेत जे या दाव्यांचे समर्थन करत आहेत. ह्यूमन राइट एक्टिविस्ट जेनिफर झेंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे चीनमधील गंभीर परिस्थिती पाहायला मिळते. हे व्हिडीओ चीनमधील सध्याच्या कोरोना स्थितीचे असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट जेनिफर जेंग यांनी सोशल मीडियावर चीनमधील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ शेअर करताना जेनिफर यांनी लिहिलंय की, “२४ डिसेंबर शांघाय सिटी हॉस्पिटल…” व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये हॉस्पिटलच्या मजल्यावर मृतदेहांचा ढीग दिसत आहे. यासोबतच जेनिफर यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो अनसन शहरातील आहे. यामध्ये एका इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये अनेक मृतदेह ठेवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णालय, पार्किंग लॉट्समध्ये मृतदेहांचे खच दिसून येत आहेत. परिस्थिती इतकी बिघडली आहे की मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक किलोमीटरची लाईन लागली आहे. शांघाई शहरातील स्मशानभूमीत भरती सुरू आहे. चीननं ८ जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमाही खुली करण्याची चर्चा आहे.

चीनमधील कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा जगासमोर येऊ नये, यासाठी चीन आता एक नवी युक्ती वापरत आहे. ज्यांच्या नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यांच्याकडून एका फॉर्मवर सह्या घेतल्या जातात. सदर व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नसल्याचं त्या फॉर्ममध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तसेच, बीजिंगच्या फ्युनरल होमला दिलेल्या नोटीसनुसार, कोणताही कर्मचारी मीडिया संस्थेशी बोलणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारचा डेटा शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Watch Video वरमाला घालताना १८० अंश वाकलेल्या वधूचा ‘हा’ व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Watch Video केरळमध्ये नववधुने स्वतःच्याच लग्नात वाचवले पारंपारिक वाद्य, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss