spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

सध्या महारष्ट्रामधलं राजकारण चांगलाच तापल्याच दिसून येत आहे. नागपूर (Nagpur) येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (winter session) शिंदे- फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Govt) काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी १००० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत लक्ष आपल्याकडे वळवले आहे. मागील सरकारमध्ये देसाई हे उद्योगमंत्री असताना त्यांनी इंडस्ट्रियल प्लॉटचे रुपांतरण करताना अनेक विकासकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य (Plot irregularity) पद्धतीने दिले असा गंभीर आरोप खासदार जलील यांनी केला आहे.

हा आरोप सुभाष देसाई यांनी फेटाळून लावला आहे. खासदार जलील यांचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असून त्यांनी त्वरित माफी मागत आरोप मागे घ्यावेत, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असा इशारा सुभाष देसाई यांनी दिला आहे. राज्याचे तत्कालीन उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी इंडस्ट्रियल प्लॉटचे कन्वर्जन करून अनेक बिल्डरांना कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने दिले आहेत, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या सर्व प्रकरणामध्ये देसाई यांचा मुलगा बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता, असा देखील आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला असून हा घोटाळा सुमारे १००० कोटींच्या घरात आहे, असे जलील यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील हे औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा:

शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतल्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा, दोन्ही गट आमने-सामने

Anil Deshmukh: तुरुंगा बाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss