काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रे दरम्यान राहुल गांधी अनेक लोकांना भेटत आहेत. अनेकांशी चर्चा करत आहेत. विविध वर्गातील लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्याशी हितगूज साधून त्यांच्यात आपुलकी निर्माण करत आहेत. यावेळी नागरिकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही ते देत आहेत. यावेळी एका इंटरव्ह्यूववेळी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी पहिल्यांदाच मनमोकळेपणानं उत्तर दिलं. त्यांना कशी पत्नी हवीय याची माहिती देताना राहुल गांधी यांनी दिलखुलास उत्तर दिलं.
An enjoyable conversation with Bombay Journey about the RD 350, Lambretta, Drones, and the future of EVs & Mobility in India.
Watch the full conversation on my YouTube channel:https://t.co/7PLzv17H7O pic.twitter.com/S2A6zLmHhF
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 27, 2022
राहुल गांधी म्हणाले, आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यासारखे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल, असं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लग्नाबाबतची त्यांची आवड सांगितली. राहुल गांधी यांना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले , “ती माझ्या आयुष्यातील प्रेम होती. ती माझी दुसरी आई होती. इंदिरा गांधींसारखे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल का, असं विचारलं असता ते म्हणाले की, हा छान प्रश्न आहे. मला अशी मुलगी आवडेल जिच्यामध्ये माझ्या आजी आणि आईचे गुण असतील. तसेच त्यांनी आपली ही मुलाखत ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.
पुढे ते म्हणाले, कोणी मला ‘पप्पू’ म्हणून संबोधले तर वाईट वाटत नाही, कारण हा सर्व अपप्रचाराचा भाग आहे. असं बोलणारे स्वत:च त्रस्त आणि घाबरलेले आहेत, असंही उत्तर राहुल गांधी यांनी दिलं. हा अपप्रचाराचा भाग आहे. जो बोलत आहेत त्यांना भीती आहे, त्याच्या आयुष्यात काहीच चांगलं नाही, त्यांचे नातेसंबंध चांगले नाहीत. जर मला शिवी देऊन त्यांना बरं वाटत असेल तर द्यावी, मी त्याचं स्वागत करेन. मी कोणाचाही द्वेष करत नाही. तुम्ही मला शिव्या देता… मी तुमचा तिरस्कार करणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
जो मोहब्बत इनसे मिली है,
वही देश से बांट रहा हूं। pic.twitter.com/y1EfLqxluU— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 24, 2022
या मुलाखतीत राहुल गांधी यांनी कार आणि बाईकबद्दल सविस्तर भाष्य केलं. माझ्याकडे स्वतःची कोणतीही कार , परंतु त्यांच्या आईकडे एक कार आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मी लंडनमध्ये राहत असताना मी आरडी ३५० बाईक चालवायचो, ती बाईक माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. सोबतच मला सायकल चालवायला आवडते आणि एकदा लॅम्ब्रेटा (स्कूटर) आवडली होती, असं त्यांनी म्हटलं. आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि ड्रोनमध्ये भारत अजूनही मागे आहे, असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
अधिवेशनाचा आज ९ वा दिवस, अनेक ठराव, प्रस्तावावर शिक्कामोर्तब?
मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा काँग्रेस पक्षाची सत्ता आणू, नाना पटोले यांचं मोठं विधान
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.