spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watch Video अरेरे…! आता विमानात देखील प्रवाशांमध्ये झाली हाणामारी

आतापर्यंत आपण रस्त्यावर हाणामारी, रेल्वेमध्ये हाणामारी पहिली होती. आणि त्याचे मजेशीर व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे देखील पहिले होते. पण आता तर चक्क विमानात देखील हाणामारी झाली आहे. आणि हा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. आकाशात हजारो फूट उंच उडणाऱ्या विमानामध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. बँकॉकहून कोलकाताकडे येणाऱ्या थाय स्माइल एअरवेजच्या विमानामध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना दि. २७ डिसेंबर रोजी घडल्याची माहिती समोर येत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानामध्ये दोन प्रवासी एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. एक फ्लाईट अटेंडंट या दोन प्रवाशांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दोन्ही प्रवाशांमध्ये जोरदार बाचाबाची सुरु असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन्ही प्रवाशी एकमेकांवर ओरडताना दिसत आहे. एक प्रवासी दुसऱ्याला ‘हँड्स डाउन’ म्हणताना ऐकू येतो. हात खाली ठेवा, असे तो वारंवार ओरडताना दिसत आहे. काही वेळातच दोघांमधील हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते. दोन्ही प्रवासी एकमेकांवर ओरडत आहेत. यावेळी एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाचा हात धरून त्याच्या कानशिलात मारतो. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु होते. यावेळी इतर काही जणही या भांडणात सामील होतात. त्यानंतर पाच ते सहा जण एका प्रवाशाला मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. विमानात उपस्थित इतर काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

प्रवासादरम्यान (traveling) आपल्यासोबत काही थरारक रोमांचकारक दृश्य बघायला मिळतात. ज्या आपल्या आठवणीत कायम स्वरूपी राहतात त्यातीलच हा एक थरारक असा किस्सा आहे. जो तेथील प्रवाश्यांच्या कायम स्वरूपी लक्षात राहील.हा व्हिडिओ मुन्ना_यादव याअकाउंट वरून शेयर करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Priya Singh BodyBuilder ‘तिने’ देशाची मान उंचावली, पण स्वत:च्या राज्यात मिळाला नाही सन्मान

‘उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द पाळत नाही…’ ट्विट द्वारे शीतल म्हात्रेचा ठाकरेंवर निशाणा, पहा काय म्हणाल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss