spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hindu Woman Beheaded In Pakistan पाकिस्तानमध्ये ४० वर्षीय हिंदू महिलेची निर्घृण हत्या, डोके आणि कातडीची कापली

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे डोके आणि स्तन तिच्या शरीरापासून वेगळे करण्यात आले होते आणि तिची कातडी सोलण्यात आली होती.

एका हिंदू महिलेच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानातील सिंधमध्ये ४० वर्षीय हिंदू महिलेची हत्या करण्यात आली आहे. महिलेची हत्या इतक्या निर्दयतेने करण्यात आली आहे की, मारेकऱ्याने महिलेचे डोके कापले आहे, तिच्या शरीराची कातडी सोलून टाकली आहे आणि स्तनही कापले आहेत. दया भील असे या महिलेचे नाव असून ती हिंदू अल्पसंख्याक समुदायातील असून ती सिंध्रोच्या सिंध येथील रहिवासी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विधवेचा विकृत मृतदेह मोहरीच्या शेतात वाईट अवस्थेत सापडला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे डोके आणि स्तन तिच्या शरीरापासून वेगळे करण्यात आले होते आणि तिची कातडी सोलण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस चौकशीसाठी मृत महिलेच्या घरीही पोहोचले आहेत.

एका हिंदू महिलेच्या हत्येनंतर पाकिस्तानच्या हिंदू खासदार कृष्णा कुमारी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. खासदार कृष्णा कुमारी यांनी घटनास्थळी लोकांशी संवाद साधला, तसेच मदतीचे आश्वासन दिले. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण असून, नागरिकांनी न्याय देण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील सांघर जिल्ह्यातील पीपल्स पार्टी ऑफ मायनॉरिटीज विंगचे प्रतिनिधीही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी त्याला या प्रकरणाची माहिती दिली आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्याचे सांगितले. लवकरच मारेकरी पकडले जातील.

याआधी मार्चमध्ये सिंधमधील एका १८ वर्षीय हिंदू महिलेची गोळ्या झाडून हत्या करून तिचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्या १८ वर्षीय हिंदू महिलेचा म्हणजेच पूजाचा मारेकरी वाहिद बक्स लशारी याला तिच्याशी लग्न करण्यापूर्वी तिने इस्लाम धर्म स्वीकारावा अशी त्याची इच्छा होती. पण तिने धर्मांतरासाठी नकार देताच लाहिरीने बळजबरीने पूजाच्या घरात घुसून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही तिने नकार दिल्यामुळे, संतप्त झालेल्या लाहिरीने तिची हत्या केली.

हे ही वाचा:

Rajesh khanna लाखो दिलो की धडकन, पण प्रेमात ठरले अयशस्वी

Pathaan पठाणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री, दीपिकाच्या भगव्या बिकिनीसह चित्रपटातील सीन कट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss