spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

थर्टी फर्स्टच्या पार्शवभूमीवर पुणे पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये, केल्या दोन मोठी कारवाई

३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम आणि पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत, आणि या पार्ट्यांमध्ये कुठला ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाला आहे. पुण्यात (Pune) ११ लाख रुपयांचे “म्याव म्याव” (Mephedrone Drugs) जप्त करण्यात आलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांची (Crime) करडी नजर आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या(Narcotics) तस्करीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे. या कारवाईत २ ट्रक आणि त्यात तब्बल २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. ऐन “थर्टी फर्स्ट” सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.

पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून म्याव म्याव ड्रग्ज म्हणजेच एमडी जप्त करण्यात आलं होतं. दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई करण्यात आली होती. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे १२ लाख रुपये एवढी होती. पोलिसांनी या कारवाईत अंमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली. ३१ डिसेंबरला दोन दिवस बाकी आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस लक्ष ठेवत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा:

भारतीय कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू? गॅम्बियानंतर आता उझबेकिस्तानने केले आरोप

हिमवादळानंतर niagara falls पूर्णपणे गोठला, अमेरिकेला तडाखा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss