spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू? गॅम्बियानंतर आता उझबेकिस्तानने केले आरोप

डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकोल हे गोड पण अत्यंत विषारी रंगहीन, जाड द्रव आहेत. बहुतेकदा हे ग्लिसरीनमध्ये दूषित पदार्थ म्हणून आढळतात.

उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दावा केला की भारतात बनवलेले कफ सिरप खाल्ल्याने तेथे १८ मुलांचा मृत्यू झाला. मंत्रालयाचा दावा आहे की मुलांनी भारतीय कंपनी मेरियन बायोटेकचे डॉक १ मॅक्स सिरप वापरले. समरकंद शहरात हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड २०१२ मध्ये उझबेकिस्तानमध्ये नोंदणीकृत झाली होती आणि त्याच वर्षीपासून त्यांची औषधे विकण्यास सुरुवात केली होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॅब चाचण्यांदरम्यान सिरपमध्ये इथिलीन ग्लायकोल नावाचे रसायन आढळून आले. या रसायनामुळे हरियाणातील मेडेन फार्मा या आणखी एका भारतीय कंपनीची चौकशी सुरू आहे.

मेडेन फार्माने बनवलेल्या कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आफ्रिकन राष्ट्र गॅम्बियाने ऑक्टोबरमध्ये केला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली होती. हे प्रकरण गांभीर्याने घेत केंद्र सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती, मात्र नंतर या कफ सिरपला सरकारने क्लीन चिट दिली होती. डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकोल हे गोड पण अत्यंत विषारी रंगहीन, जाड द्रव आहेत. बहुतेकदा हे ग्लिसरीनमध्ये दूषित पदार्थ म्हणून आढळतात. अनेक सिरप तयार करताना ग्लिसरीनचा वापर सिरपमध्ये आणण्यासाठी गोडवा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेने गांबियातील मृत्यूंचा संबंध भारतात तयार होणाऱ्या चार कफ सिरपशी जोडला होता. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ( DCGI ) डॉ. व्ही.जी. सोमाणी यांनी या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहिले होते. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने म्हटले आहे की डब्ल्यूएचओने “गांबियातील मुलांच्या मृत्यूचा अकाली संबंध भारतात तयार केलेल्या चार कफ सिरपशी जोडला ज्यामुळे जगभरातील देशाच्या औषध उत्पादनांच्या प्रतिमेवर विपरित परिणाम झाला”. डीसीजीआयने सांगितले होते की, या चार कफ सिरपचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासले गेले आणि ते नियमांचे पालन करत असल्याचे आढळले.

हे ही वाचा:

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी tick tock या दिनाचा रंजक इतिहास घ्या जाणून

New Year celebration वर्षाच्या शेवटी पुण्यातील प्रमुख रस्ते राहणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss