spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देशातील ‘मंकिपॉक्स’चा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

भारतामध्ये आता कोरोना नंतर मंकिपॉक्स या आजाराचा शिरगाव होत आहे.

केरळ : भारतामध्ये आता कोरोना नंतर मंकिपॉक्स या आजाराचा शिरगाव होत आहे. केरळ मधील एक 25 वर्षीय व्यक्ती मंकिपॉक्स बाधित असल्याची माहिती समोर येत आहे. हा रुग्ण यूएसए मधून परतला होता. तो मंगळवारी 12 जुलै या दिवशी त्रिवूनाथपुरम या विमानतळावर उतरला होता. अशी माहिती केरळचे आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी माहिती दिली.

केंद्र सरकारकडून सध्या ‘एनसीडीसी’ची टीम केरळमध्ये रवाना करण्यात आलेली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मंकिपॉक्स बाधित असलेल्या व्यक्तीचे नातेवाईक देखील आता निरीक्षणाखाली आहेत. त्याचप्रमाणे इतर 11 प्रवासी देखील रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात आलेले आहे. या रुग्ण ज्याच्या वाहनात बसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांची ही अधिकाऱ्यांनी ओळख पटवून त्यांची तपासणी केली आहे.

हेही वाचा : 

हे सरकार हिंदुत्व द्रोही आणि बेकायदेशीर – संजय राऊत

मंकी पॉक्सची लक्षणे

तज्ञांच्या मते मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे असतात तीच लक्षणे यात देखील दिसून येतात. यामध्ये सक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसून येते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजते अशी काही लक्षण यात आढळून येतात.

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर दाखल, राज ठाकरेंना भेटण्यामागचे कारण काय?

Latest Posts

Don't Miss