spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘Goodachari 2’ असेल आदिवी शेषचा पुढचा चित्रपट, जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार अभिनेता

G2 च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याची घोषणा केली आहे आणि त्यांनी अद्याप चित्रपटाची संपूर्ण कलाकार आणि क्रूची घोषणा केलेली नाही.

२०२२ आणि २०२३ हे वर्ष दाक्षिणात्य अभिनेता आदिवी शेषसाठी (Adivi Sesh)हे वर्ष खूप खास आहे. त्याने त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा तो सुरू होण्यापूर्वीच केली आहे. ‘G2’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे नाव गुडचारी २ (Goodachari 2) असे ठेवण्यात आले आहे. तो तेलुगू चित्रपट ‘गुडाचारी’चा (Goodachari) दुसरा भाग आहे, ज्याला प्रचंड यश मिळाले आणि या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.

विशेष म्हणजे ‘मेजर’च्या संपादकांपैकी एक विनय कुमार सिरीगिनीदी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाचा बनवला जाईल, असे मानले जात आहे. चित्रपटाचे अधिकृत लाँचिंग ९ जानेवारी २०२३ रोजी हैदराबाद येथे होणार आहे. G2 च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याची घोषणा केली आहे आणि त्यांनी अद्याप चित्रपटाची संपूर्ण कलाकार आणि क्रूची घोषणा केलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sesh Adivi (@adivisesh)

‘गुडाचारी’ चे दिग्दर्शन शशी किरण टिक्का यांनी केले होते ज्यात शोभिता धुलिपाला, जगपती बाबू, प्रकाश राज, सुप्रिया यारलागड्डा, वेनेला किशोर, अनिश कुरुविला, मधु शालिनी यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या.

हे वर्ष अदीवीसाठी खास ठरले

यावर्षी आदिवी शेष (Adivi Sesh) हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव म्हणून उदयास आले आहे. या अभिनेत्याने या वर्षात ‘मेजर’ (Major) आणि ‘हिट २’ (Hit 2) असे दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शूरवीर मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बायोपिक ‘मेजर’ सह, तो संपूर्ण भारतातील प्रमुख स्टार म्हणून उदयास आला आहे.

हे ही वाचा:

‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाणं अरिजित सिंगला पडलं भारी, ममता सरकारने रद्द केलं कोलकत्त्यात होणारं कॉन्सर्ट

Sushant Singh Rajputच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आला समोर, ‘क्या हाल कर दीया’ म्हणत रिया चक्रवर्तीवर भडकले चाहते

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss