spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watermelon Seeds तुम्हाला कलिंगडाचे फायदे माहित असतील, पण तुम्हाला त्याच्या बियांचे फायदे माहित आहे का ?

Watermelon seeds Benefits : कलिगंड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे सर्वांनाच माहित आहे. कलिंगड या फळामध्ये जास्त प्रमाणात पाणी आढळून येते, ज्यामुळे शरीर हायड्रेड ठेवण्यास मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का ? कलिंगडाच्या बियांचे (Watermelon seeds) फायदे ? अनेक लोक कलिंगड सेवन करतात पण त्यामधील बिया फेकून देतात. पण असे करणे टाळा कारण आरोग्यासाठी कलिंगडाच्या बियांचे (Watermelon seeds) देखील अनेक फायदे आहेत.

कलिंगडाच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. या बियांचे कवच जरा कठीण असते. या बियांचे सेवन केल्याने आरोग्यावर अनेक फायदा होतो. कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन (Protein) , कार्बोहाइड्रेट (carbohydrates), कॅल्शियम (Calcium), लोह (Iron), मॅग्नीशियम (magnesium), फॉस्फरस (phosphorus,) पोटॅशिअम (potassium) , सोडिअम (Sodium) , झिंक (Zinc) , तांबे (copper) , मॅगनीज (manganese), फोलेट (folate), फॅटी ॲसिड (fatty acids) असे अनेक पोषक तत्वे आढळून येतात.

 

कलिंगडाच्या बियाचे फायदे :

कलिंगडाच्या बियांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने , कॅल्शियम असे पोषक घटक आढळून येतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शरीरासाठी कलिंगडाच्या बियांचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.कारण रक्तदाबाचा संभंध हा थेट हृदयाशी असतो. म्हणून हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी कलिंगडाच्या बियांचे सेवन करणे.

जर तुम्हाला शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही कलिंगडाच्या बियांचे सेवन करू शकता. त्यामुळे शरीरातील रोगांशी लढण्याची ताकद मिळते. युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, मॅग्नेशियमचा संभंध रोगप्रतिकारक शक्ती यांच्याशी आहे. शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असल्यास रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यासाठी तुम्ही कलिंगडाच्या बियांचे सेवन करा.
कलिंगडाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात झिंक आढळते, त्यामुळे याचा उपयोग पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी होऊ शकतो.

 

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss