spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

साईशाच्या आईवडिलांना केले नेटकऱ्यांनी ट्रोल

'नवा गडी नवं राज्य’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय आणि या मालिकेत साईशा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

मुंबई : बालकलाकार म्हणून पुढे आलेली साईशा भोईर हिने आपला मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग तयार केला आहे. इंस्टाग्राम रिल्स मधून पुढे आलेली साईशा नंतर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरात पोहचली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात तिने घर केलं. नंतर साईशा हि मालिका सोडतेय अशी बातमी समोर आली साईशाच्या आईने साईशाच्या शाळेचं कारण देत ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सोडल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा :

युट्यूब व्हिडिओ बघून मुलाने घरात बॉम्ब तयार केल्याची घटना

 

मालिकेच्या शूटिंगला जाण्यासाठी साईशाला 2 तास आणि येण्यासाठी 2 असा वेळ लागतो. त्यामुळे साईशा तिची शाळा बुडवत होती. तिला शाळेत जायला फार आवडतं. परंतु शुटिंगमुळे शाळेचे खाडे होत आहेत. त्यामुळे तिचं बालपण आम्हाला हिरावून घ्यायचं नव्हतं. असं साईशाची आई इंस्टाग्राम लाईव्हमध्ये येऊन म्हणाली होती. परंतु गेले काही दिवस झी मराठीवर साइशाच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल होताना दिसतोय. ‘नवा गडी नवं राज्य’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय आणि या मालिकेत साईशा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर साईशाच्या आईबाबांना ट्रोल केलं जात आहे.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर दाखल, राज ठाकरेंना भेटण्यामागचे कारण काय?

साईशाच्या पालकांनी शाळा आणि अभ्यासाचं कारण देत ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका सोडली. परंतु इथे वेगळंच कारण दिसून आलं आहे. शिक्षणाचं निम्मित सांगून खोटं बोलतायत. ‘रंग माझा वेगळा’ ही सीरिअल सोडली. साईशा दुसऱ्या सीरिअलमध्ये आली कशी? अशी कमेंट करत एका चाहत्याने साईशाच्या आईबाबांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. साईशाच्या आई – वडिलांनी सांगितले नवीन मालिकेचं शूटिंग हे घराच्या जवळ आहे. आणि आठवड्यातून तीन दिवस शूट असणार आहे. साईशाची नवी मालिका येत्या ८ ऑगस्ट पासून सुरू होतेय. या मालिकेत पल्लवी पाटील, कश्यप परूळेकर, वर्षा दांदळे, अनिता दाते, आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Latest Posts

Don't Miss