spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rishabh Pant Accident Video ऋषभ पंतच्या अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, पहा अशी होती स्थिती

भारतीय संघाचा स्टार किक्रेटर ऋषभ पंत याच्या कारला आज (३० डिसेंबर २०२२) पहाटे भीषण अपघात झाला आहे. रूरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंतची कार रेलिंगला धडकली. त्याची गाडी डिव्हायडरला धडकल्यानंतर त्या गाडीनं जोरात पेट घेतला. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही (cctv footage rishbh pant car accident) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु इतक्या सुप्रसिद्ध क्रिकेटरचा अपघात होऊनही मात्र त्यांच्या मदतीला कोणी आलं नाही. त्याउलट त्याच्या खिशातून पडलेले काही पैसे आणि त्याच्या जखमी अवस्थेतील त्याचे फोटो आणि व्हिडीओजच (videos) लोकांनी काढायला सुरूवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by CricShots® (@cricshotsofficial)

हेही वाचा : 

मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा

ऋषभ पंत आपल्या मर्सिडीज कारने दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. पंतला गंभीर दुखापती झाल्या (Rishabh Pant Accident) असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे.

बस ड्रायव्हर माहिती दिली

“मी पाहिलं ऋषभ पंत जमिनीवर पडलेला होता. कारमधून आगीचा स्पार्क येत होता. आम्ही त्याला उचलून बाजूला नेलं. कारच्या आत अजून कोणी आहे का? म्हणून विचारलं. मी एकटाच आहे, ऋषभ पंत असल्याच त्याने सांगितलं. मला क्रिकेटबद्दल इतकी माहिती नाही. मी त्याच्या बाजूला उभा राहिलो. शरीरावर कपडे नव्हते. आम्ही त्याच्या अंगावर चादर लपेटली. पोलिसांना फोन केला. रुग्णवाहिका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाठवलं” अशी माहिती बस ड्रायव्हर सुशीलने दिली.

मनसेचा निवडणूक प्लान तयार!, मुंबईत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा

Latest Posts

Don't Miss