spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता समुद्रात होणारी तेलगळती थांबण्यासाठी वापरले जातायत मानवी केस, आश्चर्य वाटलं? तर पहा हा विडिओ

विशेषतः सागरी जीवनासाठी विनाशकारी ठरणाऱ्या या तेलगळतीला साफ करण्यासाठी आता अनेक देशांमध्ये मानवी केसांचा वापर केला जात आहे.

तेलगळती ही काही नवीन समस्या नाही. जेव्हापासून आपण तेल वापरत आहोत तेव्हापासून तेल गळतीची समस्या पर्यावरणाला विविध प्रकारे त्रास देत आहे. पण जिथे समस्या आहे तिथे उपायही शोधता येतो. तेलगळतीच्या रुपात उद्भवलेल्या या मोठ्या प्रश्नावर आता एक असामान्य उपाय शोधण्यात आलाय. विशेषतः सागरी जीवनासाठी विनाशकारी ठरणाऱ्या या तेलगळतीला साफ करण्यासाठी आता अनेक देशांमध्ये मानवी केसांचा वापर केला जात आहे.

तेल साफ करण्याचा एक साधारण मार्ग म्हणजे पॉलीप्रोपिलीनपासून बनवलेल्या चटया. पॉलीप्रोपिलीन म्हणजे जीवाश्म इंधनापासून म्हणजेच फॉसिल फ्युलपासून बनवण्यात आलेले नॉन – बायोडीग्रेडेबल प्लॅस्टिक. जे पुन्हा एकदा पर्यावरणासाठी घटक ठरू शकतात. तर दुसरीकडे केस आणि लव हे अविषारी, विघटनशील, पर्यावरणपूरक आणि शोषक पदार्थ आहेत. उदाहरणार्थ, मॅटर ऑफ ट्रस्टनुसार, मानवी केस हे त्यांच्या वजनाच्या अंदाजे पाचपट तेल शोषून घेऊ शकतात. म्हणजेच एक पौंड मानवी केस एका मिनिटांपेक्षा कमी वेळात एक लिटर तेल शोषून घेऊ शकते. मॅटर ऑफ ट्रस्ट ही एक ना – नफा संस्था असून ही संस्था दान केलेल्या केसांपासून चटई आणि झाडू तयार करते जी जमीन तसेच समुद्रातील तेल शोषून घेते.

तेलगळतीमुळे पिण्याचे पाणी दूषित होते, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. तसेच वनस्पती, वन्यजीव आणि अर्थव्यवस्थेलाही हानी पोहोचते. जागतिक स्तरावर जभरात घडणाऱ्या तेलगळतीच्या घटनांपैकी फक्त ५ टक्के घटना लोकांपर्यंत पोहोचतात. ही समस्या जरी लहान वाटतं असली तरी जमीन आणि समुद्रात होणारी ही तेलगळती मानवासाठी भविष्यात नक्कीच धोकादायक ठरू शकते.

१९८९ मध्ये अलबामा आधारित हेअर स्टायलिस्ट फिलिप मॅकक्रोरी यांनी एक प्रोटोटाईप डीव्हाइज डिझाईन केले होते ज्यात, तेल शोषून घेण्यासाठी केसांचा वापर करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर या डीव्हाइजची चाचणी नासाने केली होती. ज्यांनी हे डीव्हाइज खूप उत्तमरीत्या काम करते असे सांगितले होते.

दोन फूट चौरस एक इंच जाडीची चटई तयार करण्यासाठी ५०० ग्रॅम केस लागतात, जी १.५ गॅलन तेल शोषून घेऊ शकते. मानवी केसांचा एक फायदा म्हणजे त्यांची किंमत इतर कोणत्याही सामग्रीपेक्षा आहे आणि ते जागतिक स्तरावर कुठेही उपलब्ध होऊ शकतात. तसेच केस हे पर्यावरणपूरक आहेत आणि त्यांची विल्हेवाट लावणे देखील सोपे आहे. केसांच्या या चटया जाळल्या किंवा मातीत पुरल्या जाऊ शकतात. तसेच या केसांपासून कंपोस्ट खतदेखील तयार केले जाऊ शकते.

हे ही वाचा:

Anant Ambani – Radhika Merchant यांच्या एंगेजमेंट पार्टीत, १० मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी Mika Singh ने घेतले ‘इतके’ रूपये !

Rishabh Pant Accident Video ऋषभ पंतच्या अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, पहा अशी होती स्थिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss