spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तरुणांच्या फसवणुकी प्रकरणी ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याच्या चौकशीचे फडणवीसांनी दिले आदेश

भाजपा आमदार योगेश सागर यांनी वरून सरदेसाई यांची विधानसभेत तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजतंय. त्यातच विविध नेत्यांच्या चौकशीवरून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमनेसामने येत आहेत. आता या चौकशांच्या सत्रात अजून एका नेत्याची भर पडली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान चौकशी होणार असतानाच आता त्यापाठोपाठ युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचीही चौकशी होणार आहे. भाजपा आमदार योगेश सागर यांनी वरून सरदेसाई यांची विधानसभेत तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

स्काऊट्स अँड गाईड नावाची संस्था वरून सरदेसाई स्थापन केली आणि या संस्थेमार्फत तुम्हाला नोकरी लावून देतो असं आश्वासन दिलं. तरुणांनी दहा-दहा लाख रुपये जमा करून सरदेसाई यांना दिले मात्र या तरुणांची फसवणूक झाली त्यांना कोणतेही नोकरी मिळाली नाही आणि हे तरुण विदर्भातले तरुण आहेत, त्यांनी शेतजमीन विकून पैसे दिलेले आहेत. त्यामुळे वरून सरदेसाई यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी योगेश सागर यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

या सर्वांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर वरून सरदेसाई यांनी मुलांना धमकी दिली की मी तुम्हाला आता कोणतेही पैसे देणार नाही आणि याचा संवाद असलेला पेन ड्राईव्ह योगेश सागर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे! नाना पटोलेंचा खोचक टोला

Eknath Shinde अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांनी हादरवाला, पहा टीकेचे धनी कोण कोण बनले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss