spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकशाहीच्या गोष्टी करणारे अधिवेशनादरम्यान सभागृहात केवळ ४६ मिनिट होते, नाव न घेता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

अधिवेशनादरम्यान सभागृहात केवळ ४६ मिनिट होते, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली आहे आहे.

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संपलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला अधिवेशनात मंजूर केलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी काय केलं ते सांगितलं. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लोकशाहीच्या गोष्टी करणारे अधिवेशनादरम्यान सभागृहात केवळ ४६ मिनिट होते, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली आहे आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन नुकताच पार पडले. या अधिवेशनादरम्यान मोठ्या प्रमाणात कामं पार पडली. सुरुवातीच्या काळात काहींनी बहिष्कार टाकला, सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत सभागृह सातत्याने सुरू होतं. मी विरोधकांचे आभार मानतो की, त्यांनी सुरुवातीला जरी सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी अधिवेशनात सहभाग घेतला. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या चर्चा करता आल्या”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे ते म्हणाले कि, एकट्या विदर्भासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरुन निघेल. आम्ही लोकशाही मानणारी लोकं आहोत. त्यामुळे सभागृहात पूर्णवेळ थांबून कामं केली. परंतु जे लोकशाहीच्या नावाने आवई उठवतात ते केवळ ४६ मिनिटं सभागृहात होते.

या पत्रकारपरिषदेत विदर्भासाठी जाहीर केलेल्या प्रकल्पांची माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”विदर्भातले सिंचनाचे, रस्त्याचे, प्रकल्पांचे प्रश्न या अधिवेशनामध्ये सोडवले. त्यामुळे विदर्भात ४५ हजार लोकांना रोजगार आणि ७० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. आम्ही राज्याचं खनिज धोरण राबविण्याचा निर्णय घेतलाय”. तसेच देवेंद्र फडवीसांप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही, हे सरकार बदललं नसतं तर यावर्षीही अधिवेशन झालं नसतं. कारण तिकडे चीन, जपानमध्ये कोरोना आलेला आहे, म्हणत उद्धव ठाकरेंना नाव न घेता चांगलाच टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांना दिलासा, दादर स्टेशनवर सापडलेल्या ‘त्या’ बॅगमध्ये घातक काहीही नसल्याची मध्य रेल्वेने दिली माहिती

तरुणांच्या फसवणुकी प्रकरणी ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याच्या चौकशीचे फडणवीसांनी दिले आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss