spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Happy New Year नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘ हि खास गिफ्ट्स’ तुम्ही घेऊ शकतात

नवीन वर्ष (New Year) सुरु होण्यासाठी अगदी एकाच दिवस शिल्लक आहे. तर मग आता तुम्हाला नवीन वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी कोणती भेटवस्तू आणावी असा प्रश्न पडला असेल.या सुट्टीच्या काळात आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या मित्रांना ,नातेवाईकांना , एखादी भेटवस्तू द्यायची तर ती कोणती घ्यावी. अलीकडे कोरोनामुळे ऑनलाईन जगात आपल्या भेटीगाठी होत होत्या, सगळे सण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण साजरे केलेत. आता मात्र सगळं काही पूर्वपदावर आलं आहे आणि म्हणूनच हे नववर्षाचं (New Year) सेलिब्रेशन वेगळं आणि खूप खास असणार आहे. कारण आपण आता आपल्या प्रियजनांना मोकळेपणाने भेटून नवीन वर्षा साजरा आणि नवीन वर्षाची सुरुवात करू शकतो. पण नेमकं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी म्हणून भेट वस्तू काय द्यावी यावर आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

सध्याच्या काळानुसार पाहायचं झालं तर प्रोत्साहनाची गरज आहे. कारण २०२२ हे वर्ष सगळ्यांचं गेल्या तीन वर्षात झालेल्या कोरोनाच्या घटनेमुळे आणि त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानातून बाहेर पाडण्यासाठी गेलं आहे. त्यामुळे आता सगळ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे . त्यामुळे कुठल्याही वस्तूवर फोटो किंवा मोटिव्हेशनल कोट्स प्रिंट केलेलं गिफ्ट तुमच्या मित्र मैत्रिणींना तुम्ही देऊ शकता. जसे मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, कॉफी मग, कि-चैन, ज्वेलरी बॉक्स इ. हे गिफ्ट्स स्पेशल ठरतील आणि पॉकेट फ्रेंडलीसुद्धा असतील.

नवीन वर्षा सर्वांसाठी सुख समृद्धीचं असावं असे तुम्ही म्हणतात त्यासाठी उत्तम भेटवस्तू म्हणजे बांबूचे झाड शोसाठी ठेवले जाणारे बांबूचे झाड (Bamboo Tree) सुख आणि समृद्धीचं प्रतिक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे नव वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘बांबूचे झाड’ (Bamboo Tree) एक उत्तम गिफ्ट ठरू शकतं.

तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घर सुशोभित करता, त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना किव्हा नातेवाईकांना त्यांचे घर सुशोभित करण्याच्या दृष्टीकोनातून टेबल लॅम्प भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यामुळे लॅम्प गिफ्ट करणं उत्तम ठरू शकतं.

हे ही वाचा:

तरुणांच्या फसवणुकी प्रकरणी ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याच्या चौकशीचे फडणवीसांनी दिले आदेश

२०२२ हे वर्ष ‘या’ जोडप्यांसाठी नक्कीच राहील स्मरणात

राज्याच्या भल्यासाठी काय नवीन आणता येईल, ते पाहा… अजित पवारांनी शिंदेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss