spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

त्यांच्या नाकाखालून ५० लोकं निघून आले, ते काहीच…, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत. आणि तसेच मंत्र्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे हे अधिवेशन चांगलेच चर्चेत आले. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अलिकडे सांगितलं होते की फडणवीस-शिंदे सरकार ३२ वर्षांच्या तरुणाला घाबरले यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत सांगितलं की “त्यांच्या नाकाखालून ५० लोकं निघून आले, ते काहीच करु शकले नाहीत.” असे म्हणत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात (nagpur winter session) सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी विधान केलं होत की“एका ३२ वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहेत. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ३२ वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं,” असे विधान करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला होत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानाचे प्रत्युत्तर देले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) विधानाला प्रत्युत्तर देत सांगितलं की सांगितलं की ” तेव्हा सांगत होते, मुंबई पेटणार, मुंबईला आग लागणार. आग सोडा माचीसची काडी सुद्धा जळली नाही. कारण, लोकांना पटलं होतं, ह्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करत आहेत, ते बरोबर आहे. त्यामुळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिलेआम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींना घाबरलो नाही. मग, त्यांना घाबरण्याचा काय विषय आहे. त्यांच्या नाकाखालून ५० लोकं निघून आले, ते काहीच करु शकले नाहीत.,” असे विधान करत फडणवीस यांनी आदित्य ठाकरे याना टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

ग्लोइंग स्किनसाठी बनवा एलोवेरा फेसपॅक, जाणून घ्या पद्धत

लोकशाहीच्या गोष्टी करणारे अधिवेशनादरम्यान सभागृहात केवळ ४६ मिनिट होते, नाव न घेता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss