spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – ३१ डिसेंबर २०२२ ,धनु : राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग संभवत आहेत.

मेष : गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचे अवलोकन करत असताना अचानक होणारी खर्चाची वाढ- जवळच्या विश्वासू व्यक्तीकडून केला जाणारा विश्वासघात, अशा अनेक कारणांनी आजचा दिवस चर्चेत राहील. दोषारोपाने विचलित होऊ नका. मोजके शब्द प्रयोग करा. आजचा दिवस संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल.
स्त्रीयांसाठी : बहीण भावांचा सहवास लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी : गूढ अथवा रह्स्य समजून घेण्यास आजचा दिवस महत्वाचा ठरेल.

वृषभ : पूर्व पुण्याईचा लाभ प्राप्त होताना अनुभवायास मिळेल. आजचा दिवस आपण मित्रांच्या हितासाठी द्याल. इतरांबद्दलची आस्था वृद्धिंगत करणारा असेल. काही विषय लौकिक प्राप्तीसाठी देखील हाताळावे लागतील. चेहऱ्यावरील भाव लपून रहाणार नाहीत. स्रियांबद्दल अनास्था निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्योतिष शास्त्र किंवा गूढ विद्या याबाबद्दलची ओढ निर्माण होईल .
स्त्रीयांसाठी : विविध उद्योग वाढविण्याकडे कल राहील.
विद्यार्थ्यांसाठी : वडीलधाऱ्या व्यक्तींकडून कौतुकाचे बोल ऐकायला मिळतील.

मिथुन : वर्ष संपत असले तारीख बदलत असली तरी आपल्या मेहनतीचा अंत होत नाही. आजही आपणास अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव असावी. अकारण जास्त भावनिक होऊन आपण आपली फसगत करून घेऊ नका. गृहसौख्य उत्तम राहील. आपल्या स्वकर्तृत्वाने नवा कीर्तिमान स्थापन करू शकाल. गृह सजावटीसाठी नवीन वस्तूची खरेदी करू शकाल. मानसिक दुर्बलता कमी होईल.
स्त्रीयांसाठी : कुटुंबातील मंडळींसाठी आजचा दिवस द्यावा लागेल.
विद्यार्थ्यांसाठी : व्यवसायिक शिक्षणासाठी अधिक मेहनत आणि आत्मविश्वास निर्माण करावा लागेल.

कर्क : इंग्रजी वर्षाचा अखेरचा दिवस आनंद देणारा ठरेल. आज घरातून बाहेर पडल्यापासूनच आपणांस दिलासादायक घटना अनुभवायला मिळतील. वैचारिक सकारात्मकता तुम्हाला ऐच्छिक फळ प्राप्त करून देण्यास सहाय्यभूत राहील. परदेश गमनासाठी जर प्रयत्न करीत असाल तर आज तुम्हाला अपेक्षित पत्रव्यवहार होऊ शकेल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. न्याय विभागातून दिलासा मिळेल.
स्त्रीयांसाठी : आनंदी लोकांचा सहवास लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी : मित्रपरिवारासोबत आनंद साजरा कराल.

सिंह : वर्षाचे गणित मोजण्याच्या घाईत उतावळे पणा घातक ठरू शकतो . आजच्या दिवशी प्रत्येक विषय हाताळताना संयमाची आवश्यकता आहे. काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागतील. ऐतिहासिक विषयावर चर्चा करताना कोणत्याही व्यक्ती विशेष यांची अवमानना होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. दिवसाचा उत्तरार्ध काही प्रमाणात मानसिक आधार देणारा राहील.
स्त्रीयांसाठी : पारिवारिक स्नेहसंबंध सुधारतील.
विद्यार्थ्यांसाठी : अभ्यासासाठी आवश्यक तो वेळ द्यायलाच हवा.

कन्या : वर्षपूर्ती होत असताना काही समाधानकारक घटना मनाला आनंद देतील. अनेक दिवसांपासून प्रयत्नात असलेल्या कामाला गती मिळाल्याची बातमी ऐकायला मिळेल. आपण जर आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार करीत असाल तर आज आपणाला पैसा देताना उचित तारण घेतल्याशिवाय व्यवहार करणे नुकसानीचे ठरू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुय्यम व्यवसायातून चांगली आर्थिक आय होऊ शकेल.
स्त्रीयांसाठी : दैंनदिन जीवनात सहजता निर्माण होईल.
विद्यार्थ्यांसाठी : मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल.

तुला : आजचा दिवस नकळत उत्साहाने साजरा होण्याची शक्यता आहे. कारण महिलांना आईकडील नातेवाईकांचा तर पुरुषांना भावंडांचा सहवास लाभेल. जवळचे प्रवास घडून येतील. साथीच्या रोगाचा त्रास होऊ शकेल. कर्जाची मागणी केली असलयास त्या कामात तुम्हाला यश मिळेल. हितशत्रुंच्या कारवाया मनस्ताप वाढवू शकतात. मंगल कार्यासाठी खर्च करावा लागेल. वैवाहिक जीवनात अधिक समस्या उदभवू शकतील.
स्त्रीयांसाठी : प्राकृतिक कारणाने मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांसाठी : बँकिंग क्षेत्राविषयी अभ्यासात लक्ष घालावे.

वृश्चिक : उद्याच्या इंग्रजी नववर्षाची सुरुवात करताना त्याची पूर्व तयारी म्हणून आजच नवीन ध्येयधोरणांचा अवलंब करून कामकाजाची सुरुवात कराल. अभ्यासाला नवीन दिशा मिळेल. उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याने अनेक शंकांचे निरसन होईल. लेखक – पत्रकार यांच्या लेखणीतून आज प्रभावी लेखन होऊ शकेल. धर्मासाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करण्याची मानसिकता तयार कराल.
स्त्रीयांसाठी : पर्यटनाला जाल.
विद्यार्थ्यांसाठी : स्वभावात संयम वाढेल.

धनु : गेल्या वर्षभरातील अनुभवाची नोंद घेऊन कामात अधिक जबाबदारपणाने वागावे लागेल. नवीन व्यवसायाचे नियोजन उत्तमप्रकारे कराल. वाहन खरेदी – घर खरेदी-घरातील सजावटीच्या वस्तूंची खरेदी यासारख्या विषयात आज व्यस्त रहाल. अचानक धनप्राप्तीचे योग संभवतात. दुसऱ्याकडून काम करून घेण्याची तुमची हतवटी इतरांना सहज लक्षात येणार नाही.
स्त्रीयांसाठी : घर खरेदीची संकल्पना अधिक वेगाने राबवाल.
विद्यार्थ्यांसाठी : कौशल्य विकास होईल. तुम्ही करीत असलेले प्रयोग सिद्धतेकडे जातील.

मकर : आयुष्याची गणित जुळवत असताना वर्षपूर्ती केवळ हा उदयास्ताचा खेळ असतो याची अनुभूती अनुवंश येईल. वैचारिक दुर्बलतेपासून स्वतःला सावरायला शिका. मनातील शन्का कुशंका व्यक्त करा जेणेकरून जीवनात सहजता येईल. विघातक कृत्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांविषयीचा स्नेहभाव वृद्धिंगत होईल. आयकर विभाग अथवा हवाई विभाग यासंबंधी क्षेत्राशी निगडित असाल तर आज तुम्हाला अत्यन्त समाधान लाभेल.
स्त्रीयांसाठी : अधिक मेहनतीने सन्मान प्राप्त होतील.
विद्यार्थ्यांसाठी : शालेय जीवनात समाधानकारक तसेच ऊर्जावर्धक दिवस असेल.

कुंभ : आपण जीवनात घेतलेल्या जबाबदाऱ्या पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक शक्तीने – जोमाने कार्यरत व्हावे लागेल. पारिवारिक स्नेहसंबंध अधिक दृढ होतील. शेकऱ्यांसाठी आज आनंद वाढवणारा दिवस आहे. कर्ज घेणे टाळा. आज पोटाचे विकार बळावण्याची शक्यता वाटते. वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकेल. आपण केलेले वक्तव्य सामाजिक परिवर्तन करणारे ठरेल. कौटुंबिक कलह वाढू नये याबाबत काळजी घ्यावी.
स्त्रीयांसाठी : अर्थार्जनासाठी धावपळ करावी लागेल.
विद्यार्थ्यांना : निसर्ग विषयाचा अभ्यास केल्याने आनंद मिळेल.

मीन : इंग्रजी नववर्षाची कहाणी सफल संपूर्णतेकडे जाईल. आज कोणतेही काम हाती घ्याल त्याला झटपट गती मिळेल. मात्र आपण आपला उत्साह देखील कायम ठेवायची गरज आहे. मित्र परिवाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. विवाह इच्छूकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी देणारा असेल. भागीदारीतून फायदा होईल. शिक्षकांना सन्मानाची वागणूक मिळेल. आपल्या क्षेत्रात आपण विविधता आणून नवीन आदर्श स्थापित करू शकाल.
स्त्रीयांसाठी : कार्यशाळेत सहभागी व्हाल.
विद्यार्थ्यांसाठी : आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान वाढेल.

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक , गुरुजी, ठाणे.

हे ही वाचा:

ग्लोइंग स्किनसाठी बनवा एलोवेरा फेसपॅक, जाणून घ्या पद्धत

सिगरेट जीवनातील इतकी मिनिटे करते कमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss