spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

किरीट सोमय्यांच्या नव्या वर्षाचा संकल्प, घोटाळे बाहेर काढणारच असं म्हणत, मविआ मधील ‘या’ नेत्याची नावं केली जाहीर

२०२२ घ्या वर्षाचा आजचा अखेरचा दिवस. आता आपण २०२३ च्या या नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आहोत. वर्षाच्या अखेरीस अनेक जण नव्या वर्षासाठी वेगवेगळे संकल्प करत असतात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केलेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi ) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील काही नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी जाहीर केलंय. याबाबतचं ट्विट करताना त्यांनी ५ नेत्यांची नावं देखील जाहीर केली आहेत.

हेही वाचा : 

त्यांच्या नाकाखालून ५० लोकं निघून आले, ते काहीच…, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं साई रिसॉर्ट प्रकरण किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या निशाण्यावर आहे. यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan MushrifHasan Mushrif) , काँग्रेसचे नेते अस्लम खान (Aslam Khan) आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे १९ बंगलो. त्याचबरोबर अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे पदाचा व अधिकारांचा गैरवापर करीत सरकारी नोंदी व दस्त ऐवजांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. तसेच झालेल्या चर्चेदरम्यान या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे सीईओ किरण पाटील यांनी मान्य केल्याचा दावाही सोमय्या यांनी केला होता.

राशी भविष्य – ३१ डिसेंबर २०२२ ,धनु : राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग संभवत आहेत.

सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला होता. तसेच अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू होती.

Happy New Year नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘ हि खास गिफ्ट्स’ तुम्ही घेऊ शकतात

Latest Posts

Don't Miss