spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rishabh Pant ऋषभ IPL 2023 मध्ये खेळणार का? दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी कोणते पर्याय

भारताचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या कारला काल पहाटे (३० डिसेंबर २०२२) शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतची मर्सिडीज कारचा पुर्नहता जळून कोळसा झाला. ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या कपाळाला, पाठीला, गुडघ्याला दुखापत झाली आहे. पंतच्या अपघातानंतर क्रिकेट जगतासह सर्वच स्तरातील मंडळींनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. अपघातावेळी ऋषभ पंत कार चालवत होता आणि कार वेगात होती, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. आता ऋषभ प्रकृती स्थिर आहे. परंतु आता ऋषभ आयपीएल मध्ये खेळणार का असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

हेही वाचा : 

Happy New Year 2023 वर्ष अखेरीस सेलेब्रेशनसाठी नागरिकांची चहेलपहेल सुरु

ऋषभ पंतच्या अपघातामुळे आयपीएल ( IPL 2023 ) 2023 मध्ये खेळणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सला कर्णधारपद (Delhi Capitals) एका मजबूत खेळाडूकडे सोपवायचे आहे. यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे चांगले पर्याय आहेत. वॉर्नर हा अनुभवी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच त्याने आयपीएलमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला पृथ्वी आहे. तो तरुण असण्यासोबतच प्रतिभावानही आहे.

पंत जर आयपीएलसाठी उपलब्ध झाला नाही तर त्याच्या जागी कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नरची निवड केली जाऊ शकते. वॉर्नरला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल अशा दोन्ही ठिकाणच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता आणि त्याने विजेतेपद देखील मिळवून दिले होते. वॉर्नरलने आयपीएलमध्ये ६९ सामन्यात नेतृत्व करत ३५ मध्ये विजय मिळवला आहे. ३२ मध्ये पराभव तर २ मॅच टाय झाल्यात. त्याच्या विजयाची टक्केवारी ५२.१७ टक्के इतकी आहे.

किरीट सोमय्यांच्या नव्या वर्षाचा संकल्प, घोटाळे बाहेर काढणारच असं म्हणत, मविआ मधील ‘या’ नेत्याची नावं केली जाहीर

युवा फलंदाज पृथ्वीबद्दल बोललो तर त्याने अंडर-19 क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. पृथ्वीचा अनुभव फारसा नसला तरी तो प्रतिभावान आहे. त्यामुळे कर्णधारपदासाठी दिल्ली पृथ्वीकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र संघ काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.

Latest Posts

Don't Miss