spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Myanmarच्या नेत्या आंग सान स्यू की यांना ३३ वर्षे राहावे लागणार तुरुंगात, जगभरातून केला जातोय निषेध

अधिकार गटांनी हा निकाल प्रहसन म्हणून फेटाळला आहे आणि म्हटले आहे की त्यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत.

नोबेल पारितोषिक विजेत्या आणि म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांना आता ३३ वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. म्यानमारच्या लष्करी न्यायालयाने शुक्रवारी आणखी एका प्रकरणात सात वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावली. यासह त्यांची एकूण तुरुंगवासाची मुदत आता ३३ वर्षे झाली आहे. आंग सान स्यू की यांना २०२० च्या निवडणुकीत म्यानमारच्या जनतेने एकतर्फी बहुमत दिले होते, परंतु लष्कराने सत्तापालट करून २०२२१ मध्ये त्यांना अटक केली. तेव्हापासून स्यू की तुरुंगात आहेत.

न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने स्यू कींच्या अडचणीत भर पाडली आहे. गेल्या आठवड्यातच, संयुक्त राष्ट्रांनी स्यू की यांची लवकर सुटका करण्याची मागणी केली. पण असे झाले नाही. स्यू की यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात ठेवल्याबद्दल जगभरातून निषेध होत आहे. ७७ वर्षीय स्यू की यांना त्यांच्यावरील अनेक आरोपांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये भ्रष्टाचारापासून ते वॉकी-टॉकीजचा बेकायदेशीर ताबा आणि कोविड-19 निर्बंधांचे उल्लंघन यांचा समावेश आहे. याशिवाय, हेलिकॉप्टर भाड्याने घेणे, खरेदी करणे आणि देखभाल करणे यासंबंधीच्या भ्रष्टाचाराच्या पाच प्रकरणांमध्ये त्या दोषी आढळल्या आहेत, ज्यामुळे “देशाचे नुकसान” झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

आंग सान स्यू की यांना आता ३३ वर्षे तुरुंगात काढावी लागणार

आंग सान स्यू की ज्यांना १८२ महिन्यांच्या खटल्यानंतर ३३ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला आहे. अधिकार गटांनी हा निकाल प्रहसन म्हणून फेटाळला आहे आणि म्हटले आहे की त्यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. पत्रकारांना न्यायालयीन सुनावणीस उपस्थित राहण्यास मनाई आहे आणि आंग सान स्यू की यांच्या वकिलांना माध्यमांशी बोलण्यास मनाई आहे. आँग सान स्यू की यांच्या तुरुंगाकडे लष्कराने बांधलेल्या राजधानी नेपिडावमध्ये जाणारा रस्ता निकालापूर्वी वाहतुकीपासून मोकळा करण्यात आला आहे. कारण त्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत.

आंग सान स्यू की या निर्णयाविरोधात अपील करणार?

आंग सान स्यू की या ताज्या निकालाविरुद्ध अपील करणार आहेत. त्याच्यावर खटला सुरू झाल्यापासून त्या एकदाच खुल्या कोर्टात दिसल्या आहेत. जगाला संदेश देण्यासाठी त्या त्यांचा वकिलांवर अवलंबून आहेत. म्यानमारमध्ये अनेक दशकांपासून लोकशाहीसाठी झालेल्या अनेक संघर्षांवर आंग सान स्यू की यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु आता त्यांच्या पक्षाने या घटनेनंतर अहिंसेचे मूळ तत्व सोडले आहे, “पीपल्स डिफेन्स फोर्सेस” नियमितपणे देशभरातील लष्कराशी संघर्ष करत आहेत.

Twitter Update जानेवारी २०२३ मध्ये एलोन मस्क देणार मोठी भेट, ट्विटरमध्ये येणार हे खास वैशिष्ट्य

कोरियन ॲक्टर Lee Jong Suk आणि IU करतायत एकमेकांना डेट, दोघांच्याही एजंसींनी दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss