spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉयकॉटमुळे फ्लॉप ठरलेला Laal Singh Chaddha पुन्हा का होतोय सोशल मीडियावर ट्रेंड?

चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट करण्याची मागणी सातत्याने झाली होती. मात्र आता सोशल मीडियावर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी चर्चा आहे.

आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट करण्याची मागणी सातत्याने झाली होती. मात्र आता सोशल मीडियावर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी चर्चा आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ठरलेल्या तारखेच्या आधीच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण ‘लाल सिंह चड्ढा’ला ओटीटीवर खूप प्रेम मिळाले. आता सोशल मीडियावर #RediscoveringLSC! हा हॅशटॅग सध्या व्हायरल होत आहे.

नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर ‘लाल सिंह चड्ढा’ सुमारे ६.६३ दशलक्ष तास पाहिला गेला आणि सोशल मीडियावर वापरकर्त्यांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. OTT वर रिलीज झाल्याच्या आठवड्यात, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर भारतात पहिल्या क्रमांकावर होता आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर होता. ‘लाल सिंग चड्ढा’ला भारतीय प्रेक्षकांमध्ये अनेक नवीन चाहते मिळाले ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहिला नाही. हि काही आश्चर्याची बाब नाही, कारण आमीर खान नेहमीच त्याच्या चित्रपटांद्वारे भावनांना खोलवर स्पर्श करण्यात यशस्वी झाला आहे ज्यामुळे त्याच्या या चित्रपटाला उशिरा का होईना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना प्रतिसाद दिला आहे.

विशेष म्हणजे, चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि प्रेक्षकांनी याला ‘मास्टरपीस’ चित्रपट म्हणून संबोधले आहे. या प्रतिक्रियांचा विचार करता, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि प्रेक्षक आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाच्या प्रेमात पडले आहेत! अलीकडेच आमिर खानने ‘तो काही काळ अभिनयातून ब्रेक घेत आहे’ अशी घोषणा केली होती. त्‍याने त्‍याच्‍या आगामी ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपलं नावही वेगळं केलं आहे. आणि आता केवळ निर्माता म्हणून त्या चित्रपटाशी जोडला गेला आहे. आता ‘लाल सिंह चड्ढा’ ला मिळणारं लोकांचं प्रेम ही आमिर खांसाठी चांगली बातमी आहे.

हे ही वाचा:

ठरलं तर मग! ‘या’ तारखेला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवानी करणार लग्न

कोरियन ॲक्टर Lee Jong Suk आणि IU करतायत एकमेकांना डेट, दोघांच्याही एजंसींनी दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss