spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतराच्या स्थगितीवर, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याच्या निर्णयावर उद्या सुनावणी होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर पुन्हा एकदा फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली याविषयी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आता ते राज्य सरकारला विचारा” असे उत्तर शरद पवार यांनी दिले. पुढे म्हणाले, “आमच्या किमान रणनीतीचा जो कार्यक्रम करण्यात आला होता. त्यावेळी त्याचा हा भाग नव्हता तसेच निर्णय शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून आमच्याशी याबाबत कोणताही सुसंवाद नव्हता. नामांतराळाबाबत निर्णय घेतल्यानंतर आम्हाला समजले तेव्हा निषेद वगैरे करणे त्याला अर्थ नाही. त्यावेळी आम्ही सर्वांनी सामूहिक संमतीही नव्हती दिली. मंत्रिमंडळ कामाची पद्धत असते मंत्रिमंडळ कामाच्या पद्धतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय अंतिम असतो. तिथे मतदान नसते फक्त मत व्यक्त केली जातात मंत्रिमंडळ बैठकीत मत व्यक्त केली गेली मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा अंतिम असतो त्या पद्धतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला” असे शरद पवार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

पावसाळ्यात मेकअप कसा टिकवायचा? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Latest Posts

Don't Miss