spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Cristiano Ronaldoने नव्या फुटबॉल क्लबशी केला करार, १७०० कोटींहून जास्त असणार वार्षिक वेतन

आता आपण जाणून घेणार आहोत कि रोनाल्डोचा करार किती काळासाठी आहे आणि रोनाल्डोला एका वर्षासाठी भारतीय चलनात किती पैसे मिळणार आहेत

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड सोडून सौदी अरेबियाच्या (Al Nassr Football Club) क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याची बातमी आधीच होती पण आता क्लबने अधिकृत माहिती देऊन याची पुष्टी केली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत कि रोनाल्डोचा करार किती काळासाठी आहे आणि रोनाल्डोला एका वर्षासाठी भारतीय चलनात किती पैसे मिळणार आहेत(Ronaldo income In Indian rupees Yearly) .

क्रिस्टियानो रोनाल्डोने नवीन करार केल्यानंतर त्याची अधिकृत माहिती अल नासर फ़ुटबॉल क्लबने दिली आहे. अल नासरने (Al Nassr Football Club) अधिकृत घोषणा पोस्टमध्ये म्हंटले कि – हा एक करार आहे जो केवळ आमच्या क्लबलाच नव्हे तर आमच्या देशाला, येणाऱ्या पिढ्यांना, मुले आणि मुलींना सर्वोत्तम बनण्यासाठी प्रेरित करेल. रोनाल्डो तुमचे नवीन घरात स्वागत आहे.

अल नासर रोनाल्डोला किती पैसे देत आहेत?

रिपोर्टनुसार, क्रिस्टियानो रोनाल्डोने नवीन क्लबसोबत २०२५ पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला २०० दशलक्ष युरोसाठी करारबद्ध केले आहे. जर आपण भारतीय चलनात त्याचे मूल्य मोजले तर रोनाल्डोला एका वर्षात १७ अब्ज रुपयेपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. म्हणजे १७०० कोटी रुपये, जे जगातील कोणत्याही खेळाडूचे कमावलेल्या उत्पन्नपेक्षा सर्वात जास्त आहे.

रोनाल्डो आणि क्लबमध्ये ३ वर्षांचा करार आहे, म्हणजेच २०५ पर्यंत रोनाल्डो सौदी अरेबियाच्या या क्लबसोबत खेळणार आहे. जर आपण ३ वर्षांच्या कमाईबद्दल बोललो तर रोनाल्डो येथून ५ हजार कोटींहून अधिक रुपये घेईल. तुम्हाला माहिती आहेच की, क्रिस्टियानो रोनाल्डोने जुव्हेंटस सोडले आणि त्याच्या माजी क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला, परंतु काही काळापूर्वी रोनाल्डोने वादानंतर तो क्लबसुद्धा सोडला.

हे ही वाचा:

बॉयकॉटमुळे फ्लॉप ठरलेला Laal Singh Chaddha पुन्हा का होतोय सोशल मीडियावर ट्रेंड?

New Year 2023 नवीन वर्षात स्वतःसाठी करा हे ‘या’ पाच संकल्प, जीवनाला शिस्त लागण्यास होईल मदत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss