spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवं वर्षात पाहिल्याचं दिवशी बाहेर पडताय तर, मेगाब्लॉकचे हे वेळापत्रक जाणून घ्या

मुंबईकरांनो, वर्षाच्या पहिल्याच दिवशी घराबाहेर पडणार असाल तर, तुमच्यासाठी हि महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या (New Year 2023) पहिल्या दिवशीही तुमची मेगाब्लॉकपासून (Local Train Mega Block) सुटका नाही.

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, वर्षाच्या पहिल्याच दिवशी घराबाहेर पडणार असाल तर, तुमच्यासाठी हि महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या (New Year 2023) पहिल्या दिवशीही तुमची मेगाब्लॉकपासून (Local Train Mega Block) सुटका नाही. मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक –

  • पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)
  • पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०. ३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • पनवेल येथून सकाळी ११. ०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०. ०१ ते दुपारी ३. २० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील.
  • मेगाब्लॉकच्या वेळेत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. तर, बेलापूर/ नेरुळ – खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.

मध्य मार्गावर मेगाब्लॉक –

  • सकाळी ११. ०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.
  • ठाणे येथून सकाळी १० .५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हे ही वाचा:

Happy New Year ‘या’ देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

Happy New Year 2023 भारतात ३१ तारखेला १२ वाजता सुरुवात होणार नव्या वर्षाची, पण ‘या’ देशांमध्ये आधीच साजरे केले जातेय नवीन वर्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss