spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रश्मी ठाकरे अडचणीत, किरीट सोमय्या यांनी ‘या’ प्रकणात केली तक्रार दाखल

काही दिवसांपासून महाराष्ट्रामधील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. १९ बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात (Revdanda Police Station) पोहोचले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) आणि अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात १९ बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलं आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही केली आहे. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी काल एक सूचक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी उद्यापासून ठाकरे कुटुंबाच्या १९ बंगल्याच्या (19 bungalows) घोटाळ्यांचे हिशेब सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. उद्या नवीन वर्ष आहे. सकाळी ११.३० वाजता जाऊन रेवदंडा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करणार आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

हे ही वाचा:

Earthquake नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली-हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के

Corona Virus नवीन वर्षातही कोरोनाच सावट कायम, सतर्क रहा !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss