spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कापसाच्या दरात वाढ, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

जळगाव बाजारपेठेत कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या आठवड्यामध्ये कापूस दरात एक ते दीड हजार रुपयांची घट झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, आज जळगाव बाजारपेठेत कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच आणखी काही प्रमाणात कापसाच्या दरात वाढ होण्याची अपेशखा शेतकऱ्यांकडून वर्तवली जातेय.

मागच्या आठवड्यामध्ये कापूस पिकाच्या दरामध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होते. कापूस दरात एक ते दीड हजार रुपयांची घसरण झाल्याने कापसाच्या विक्रीमध्ये ७००० ते ७५०० रुपयांपर्यंत घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेच वातावरण निर्माण झालं होत. जागतिक पातळीवर कापूस दरात घट झाल्याने हे दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र,आज पुन्हा कापूस दरात प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांची वाढ झाल्याने हे दर ८०००ते ८५०० असे झाले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज झालेली हि दरवाढ जागतिक पातळीवर कापूस दरात वाढ झाल्यानं झाली असल्याचं सांगितले जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियाकडून तीन लाख गाठी म्हणजेच ५१ हजार टन कापूस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन लाख गाठी कापसाची विनाशुल्क आयात करण्यात येणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत विविध शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कापूस आयातीवर लागू करण्यात आलेलं ११ टक्के शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातले परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या विदेश व्यापार संचालनालयानं प्रसिद्ध केलं आहे. २०२२ च्या आयातीचा विचार केला तर यावर्षी आयातीत मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतातून कापूस किंवा रुई, सुताची निर्यात ठप्प आहे. अशातच परदेशातून भारतात कापूस आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय योग्य नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

देशातील जिनींग प्रेसिंग कारखानदार, व्यापारी, निर्यातदार आदींची संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (Cotton Association of India) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. यावेळी कापूस आयातीसाठी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क दूर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर ही मागणी मान्य करत आयात शुल्क माफ करण्यात आलं आहे.

 

हे ही वाचा:

अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेशला डेट करतेय तृप्ति डिमरी, फोटो शेअर करत दिली नात्याची कबुली?

शिंदे गटात अस्वस्थता? | Abdul Sattar | Eknath Shinde | Deepak Kesarkar

Makarand Anaspure यांचे मालिकाविश्वात पुनरागमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss