spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तोंडात सिगारेट, हातात कुऱ्हाड, वाढलेली दाढी रणबीर कपूरच्या ‘Animal’ चा फर्स्ट लूक पोस्टर झाला रिलीज

या पोस्टरमध्ये रणबीरचा लूक खूपच भीतीदायक दिसत आहे.हे पोस्टर पाहून रणबीरच्या चाहत्यांचे न्यू इयर सेलिब्रेशन द्विगुणित झाले आहे.

आज वर्षाचा पहिला दिवस आहे. २०२३ चे देशभरात मोकळ्या हातांनी स्वागत करण्यात आले. नव्यावर्षाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्येही जल्लोषाचे वातावरण होते. सर्व स्टार्सनी नवीन वर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले आहे आणि अशातच रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ॲनिमल’ (Animal first look poster out) या चित्रपटाचे पोस्टरही मध्यरात्री रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रणबीरचा लूक खूपच भीतीदायक दिसत आहे.हे पोस्टर पाहून रणबीरच्या चाहत्यांचे न्यू इयर सेलिब्रेशन द्विगुणित झाले आहे. रणबीर कपूरचा ॲनिमल हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्नासुद्धा दिसणार आहे.

रणबीर कपूरचे पोस्टर मध्यरात्री रिलीज

रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटाचे पोस्टर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रिलीज करण्यात आले आहे. नववर्षाच्या मध्यरात्री ॲनिमलचे पोस्टर पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रणबीरच्या हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड, वाढलेली दाढी आणि तोंडात सिगारेटदेखील दिसत आहे. या चित्रपटामुळे इतक्या वर्षात पहिल्यांदा रणबीर एका भयानक भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)

 तसेच रणबीरच्या अंगावर असलेलं रक्त आणि त्याच्या हातात असलेली सिगारेट असल्यामुळे या लूकमध्ये रणबीर अधिकच धोकादायक दिसत आहे. रणबीर कपूर पहिल्यांदाच अशा व्यक्तिरेखेत दिसणार आहे आणि यापूर्वी त्याने साकारलेल्या भूमिकाअगदी सध्या आणि मनमोहक होत्या. आता पहिल्यांदाच रणबीर कपूर खतरनाक अवतारात दिसणार आहे.

पोस्टर समोर आल्यानंतर, चाहते अभिनेत्याच्या कूल लूकचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी रणबीरला याबद्दल ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘ये पुष्पा की कॉपी करना चाहता है’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘हे पुष्पाचा रिमेक वाटत आहे.’ तिसर्‍याने लिहिले, ‘कबीर सिंग आणि पुष्पा या दोन्ही पात्रांचे मिश्रण आहे का?’ इतकंच नाही तर बहुतेक लोक म्हणतात की, निर्मात्यांनी कबीर सिंग आणि पुष्पा यांना मिक्स करून ॲनिमलमध्ये रणबीरचा लूक तयार केला आहे.

हे ही वाचा:

Bigg Boss 16 ‘या कारणामुळे शो ची पातळी … ‘, घराबाहेर येताच विकास मानकतलाने केला गंभीर आरोप

अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेशला डेट करतेय तृप्ति डिमरी, फोटो शेअर करत दिली नात्याची कबुली?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss