spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जिंदाल कंपनीत भीषण स्फोटात ३० ते ३५ कर्मचारी अडकल्याची भीती

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये भीषण घटना घडली आहे. नाशिकजवळ (Nashik) असलेल्या इगतपुरीतील मुंढेगावजवळ (Mundhegaon in Igatpuri) जिंदाल समूहाची (Jindal Group) कंपनी आहे. जिंदालच्या या कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. जिंदाल समूहाच्या पोलिफिल्मची निर्मिती (Formation of polyfilm) करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. आगीमध्ये काही कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कर्मचारी हे आत अडकल्याचंही सांगण्यात येत आहे. पोलिसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. या कंपनीत कामकरत असलेले ३० ते ३५ कर्मचारी अडकल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत ३ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत मोठी आग (big fire) लागली. जिंदालच्या अग्निशमन विभागासह महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra), घोटी टोलनाका (Ghoti toll ) येथील अग्निशमनच्या बंबांकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक महापालिकेचे (Nashik Municipal Corporation) बंबही आग नियंत्रणात आणण्यासाठी मुंढेगावकडे रवाना झालेत. नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे (Nashik Rural Fire Brigade ) जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे लोळ दूरवर दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी मुंडे या गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत सकाळी १०-११ च्या सुमारास भिषण स्फोट झाला. या स्फोटाचा खुप मोठा आवाज झाला. पॉलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या जिंदाल ग्रुपच्या या कंपनीत स्फोट झाला. या आगीमध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या आगीचे लोळ वर वर येत होते.

ही आग १-२ किमी अंतरावरून वरून सुध्दा दिसले. ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. विषेश बाब म्हणजे ही आग ज्या ठिकाणी लागली आहे. त्या ठिकाणवरून १५० मीटर अंतरावर मोठा डिझेल टॅंक आहे. आणि त्या टॅंकमध्ये सुमारे २० हजार लिटर पेक्षा जास्त डिझेल आहे.

हे ही वाचा:

वर्षाच्या सुरवातीलाच शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर, जाणून घेतल्या समस्या

तोंडात सिगारेट, हातात कुऱ्हाड, वाढलेली दाढी रणबीर कपूरच्या ‘Animal’ चा फर्स्ट लूक पोस्टर झाला रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss