spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य, २ जानेवारी २०२३ , कर्क राशीच्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस…

आजचा दिवस पारिवारिक स्नेह संबंध अधिक वृद्धिंगत करणारा आहे. आर्थिक आवक वाढल्याने समाधान लाभेल. परोपकाराची भावना निर्माण होईल.

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक, गुरुजी, ठाणे

मेष : आजचा दिवस पारिवारिक स्नेह संबंध अधिक वृद्धिंगत करणारा आहे. आर्थिक आवक वाढल्याने समाधान लाभेल. परोपकाराची भावना निर्माण होईल. आर्थिक आवक वाढली किंवा तसे संकेत असले तरी मोठी गुंतवणूक करण्याची स्थिती नाही ही बाब ध्यानात घेणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा अधिक उजळ बनेल. क्रीडा क्षेत्रात प्रगती दिसून येईल.
स्त्रीयांसाठी: स्नेह जपाल .
विद्यार्थ्यांसाठी : व्यावहारिक ज्ञानात भर पडेल.

वृषभ : आज आपल्या मनस्थितीत आमूलाग्र सुधारणा दिसून येईल. मनात दडून बसलेले विचार व्यक्त केल्याने अनेक मार्ग सुकर होण्यास मदत होईल. निवृत्तीनंतरचा जीवन प्रवास सुरु असल्यास आपल्या विचारांशी सुसंगत लोकांच्या भेटीगाठी होऊन नवचैतन्य संचारेल. तुमच्या उत्साहामुळे अनेकांना आदर्श मिळेल. कौटुंबिक जीवनासोबतच व्यावसायिक जगतात सुद्धा आपण नवीन आदर्श व्यक्तिमत्व म्हणून गौरविले जाल.
स्त्रीयांसाठी : प्रेमळ विचारांच्या लोकांचा सहवास लाभेल.
विद्यर्थ्यांसाठी : शरीर सौष्ठव किंवा बलाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केलेली तयारी इष्ट परिणाम देईल.

मिथुन : प्रत्येक विषय फक्त व्यवहारातच तोलून बघण्याची मानसिकता बनण्याची शक्यता आहे. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात तुमच्या गुणांची स्तुती केली जाऊ शकते. तुमच्या विनोदी बुद्धीमुळे अनेकांची करमणूक होईल. काही ऐतिहासिक मूल्ये जपताना नवीन संशोधनाची कामगिरी देखील पार पाडाल. आपण जर चित्रपट निर्मिती किंवा तत्सम क्षेत्राशी निगडित कामात जोडलेले असाल तर तूर तुम्हाला आज व्यावसायिक यश प्राप्त होऊ शकेल.
स्त्रीयांसाठी : भावंड किंवा आईकडील नातेवाईकांचा सहवास लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी : कमजोरी निर्माण झाल्याने अभ्यासात लक्ष लागण्यास अधिक मेहनत घ्यावी लागेल.

कर्क : आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अनुकूल आहे. तसेच अन्नधान्याचे घाऊक किंवा किरकोळ व्यापारी यांच्यासाठी फायद्याचा आहे. सुगंधी द्रव्याचे व्यापारी , कापूस उत्पादक किंवा तत्सम क्षेत्रातून आर्थिक लाभ होतील. कलाक्रीडा क्षेत्रातील मंडळींना स्पर्धेसाठी निवड झाल्याचा आनंद मिळेल. वडिलोपार्जित व्यवसायाला नवे रंगरूप देऊ शकाल. पूर्व सुकृताने मिळेल असा भाव निर्माण झाल्यास तो तुमचा केवळ भ्रमच ठरेल.
स्त्रीयांसाठी : संततीकडून सहयोग लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी : पर्यटन किंवा तत्सम विषयाचा अभ्यास वाढेल.

सिंह : राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावाल. तुम्हाला जबाबदारीच्या पदावर नियुक्त केले जाऊ शकते. तुम्हाला तुमच्या सद्गुरुंच्या कृपेची अनुभूती मिळू शकेल. सामंजस्याने कोणताही विषय हाताळल्यास त्याचे शुभ परीणाम अनुभवायला मिळतील. प्रवासातून फार काही हाती लागणार नाही. फाजील आत्मविश्वासामुळे फसगत होण्याची शक्यता आहे. कपडा व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष लाभ मिळवून देणारा ठरू शकेल.
स्त्रीयांसाठी : विश्वासार्हता टिकवण्याचा प्रयत्न करा.
विद्यार्थ्यांसाठी : कला क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवू शकाल.

कन्या : तुम्हाला आज कुणाची तरी जबाबदारी घ्यावी लागेल. त्यातूनच आर्थिक बोजा देखील उचलावा लागण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयाची पूर्ण माहिती घेऊन , तशी शहनिशा करूनच त्यात आपली जबाबदारी निश्चित करावी. नियोजनाशिवाय कोणतेही कर्ज देणे घेणं यासारखे व्यवहारात पडू नये. जवळचे प्रवास घडतील. इतरांना कुतूहल वाटावे अशी कामगिरी देखील आपल्या हातून घडू शकेल.
स्त्रीयांसाठी : कौटुंबिक मतभेद वाढू नयेत यासाठी प्रयत्नशील रहाल.
विद्यार्थ्यांसाठी : संसर्गजन्य रॊगापासून बचाव होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

तूळ : आज आपण एकदम आल्हाददायक वातावरणात दिवस व्यतीत कराल. कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्तिविशेष यांचेकडून तुमची स्तुती केली जाईल. चित्रकला – विद्युत उपकरणांसाठी आवश्यक सर्किट तयार करणे – इमारतीचा आराखडा तयार करणे यासारख्या विषयात आपण आज अत्यन्त उत्साहाने कार्यरत रहाल. मधुमेह-रक्तदाब किंवा कर्करोग असणाऱ्यांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.
स्त्रीयांसाठी : मैत्रिणींचा उत्तम सहयोग लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी : आपणास आज वॆद्यकीय क्षेत्राविषयक अभ्यासात वाव मिळू शकेल.

वृश्चिक : तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील. मित्रांसोबत अनेकविध विषयावर सकारात्मक चर्चा होईल. आय टी क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस अत्यन्त दिलासादायक राहील. नवी संशोधने – भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून भविष्यातील साडपडसादाचा लेखाजोखा सादर करणे यासारख्या विषयात महत्वाची निरीक्षणे नोंदवू शकाल. तुमचा आत्मविश्वास अधिक घट्ट व्हावा यासाठी आजचा घटनाक्रम अत्यन्त उपयुक्त ठरेल.
स्त्रीयांसाठी : कौटुंबिक जीवनात रमून जाल.
विद्यार्थ्यांसाठी : तुमची निरीक्षण तज्ज्ञ मंडळींना अधिक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करतील.

धनु : तुमचे साथीदार अत्यन्त सकारात्मक आणि पूर्ण समर्पणाने तुम्हाला सहकार्य करतील. आपण आपली मानसिकता स्थिर राहण्यासाठी दैवी उपासना करावी. जीवनात घडून गेलेल्या काही घटनांचे साडपडसाद देखील अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही विषयावर चर्चा करताना सतर्कता जरूर बाळगावी मात्र अविश्वासर्हता मुळीच नसावी.
स्त्रीयांसाठी : खाद्य पदार्थांविषयी अधिक रुची वाढेल.
विद्यार्थ्यांसाठी : नशिबावर अवलंबुन राहू नका.

मकर : आजचा दिवस तुमच्यासाठी सौख्याचा आहे. मात्र वडिलांसोबाबत मतभेद वाढणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. रसायन – टेलिव्हिजन – धातू अशा प्रकारच्या व्यवसायाशी निगडित कामकाज असेल तर त्यातून आर्थिक लाभ वाढू शकतात. राजकारणातील मंडळींना समाजमनावर आपला ठसा उमटवण्यात यश मिळेल. वाहन व्यवसायातील लोकांना देखील आजचा दिवस काहीसा दिलासादायक राहील.
स्त्रीयांसाठी : गृह सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकाल.
विद्यार्थ्यांसाठी : विविध उपकरण बनवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : आज तुम्ही वाहन खरेदीचा विचार कराल. आबाळ वृद्धांसाठी आजचा दिवस महत्वपूर्ण घडामोडींचा असेल. आपण आपल्या लोकांपासून दूर रहाण्याचा विचार कराल. विशेषकरून मानसिक दुर्बलता जाणवण्याची शक्यता आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रमात सहभागी झाल्याने दिलासादायक वातावरणाचा सुखद अनुभव मिळेल. प्रसंगावर मात करण्यासाठी पूर्व आयुष्यातील अनुभवांचा खजिना मुक्त करावा.
स्त्रीयांसाठी : सौजन्याने वागा.
विद्यार्थ्यांसाठी : तुम्हाला तुमच्या गतीने चालण्यास अनुकूल वातावरण मिळेल.

मीन : आपण आज इतरांसाठी काहीतरी करण्याचा चँग मनी बाळगाल. तुमचे सहकारी देखील तुमच्या मत-भूमिकेशी सहयोगाची भूमिका घेतील . तुम्ही असलेल्या कामात तुम्हाला आधी स्वारस्य निर्माण होऊन आत्मिक आनंद देखील प्राप्त होईल. राजकारणी लोकांसाठी आजचा दिवस अत्यन्त सकारात्मक प्रतिसाद देणारा राहील. आपण जर पर्यटनाला जाण्याचा विचार मनात करीत असाल तर त्याचे पूर्व नियोजन आज होईल.
स्त्रीयांसाठी : तुमच्याबद्दल आदर- सन्मान वाढेल.
विद्यार्थ्यांसाठी : शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्यासाठी आर्थिक ओढाताण होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

Exclusive : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? पंडित राजकुमार शर्मा म्हणाले…

Exclusive : पंडित राजकुमार शर्मानी केली भविष्यवाणी, आदित्य ठाकरे बनणार नवीन हिरो!

Exclusive : २०२३ हे वर्ष मुख्यमंत्री शिंदेंना कसे जाणार?; पंडित राजकुमार शर्मा म्हणाले, १० – १५ लोक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss