spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

राजस्थानमध्ये रेल्वे अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जोधपूरहून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रेल्वे रुळावरून उतरले. ही दुर्घटना पालीच्या रजकियावास येथे झाला.

राजस्थानमध्ये रेल्वे अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जोधपूरहून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रेल्वे रुळावरून उतरले. ही दुर्घटना पालीच्या रजकियावास येथे झाला. या दुर्घटनेत १० लोक जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच रेल्वेचंही कोणतंही नुकसान झालं नसल्याचं वृत्त आहे. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ प्रवाशांची सुटका केली. तसेच ही संपूर्ण रेल्वे खाली करण्यात येत आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून तोपर्यंत हा मार्ग ब्लॉक करण्यात आला आहे.

आज पहाटे ३.२७ वाजता हा अपघात झाला. वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले. रजकियावास-बोमदरा सेक्शनच्या दरम्यान हा अपघात झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रवाशांना मदत पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी एक ट्रेन रवाना केली आहे, अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

महाव्यवस्थापक-उत्तर पश्चिम रेल्वे आणि इतर उच्च अधिकारी जयपूर येथील मुख्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओंनी दिली. त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत या मार्गावर ब्लॉक करण्यात आला आहे. या मार्गावरील चार एक्सप्रेसचे मार्गही बदलण्यात आलेत. या शिवाय प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाचे उच्चअधिकारी घटनास्थळी रवाना होत आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी हे अधिकारी घटनास्थळी येणार आहे. तसेच जयपूर येथील मुख्यालयातील कंट्रोल रुममधून घटनेवर लक्ष ठेवलं जात आहे.

 समोर आलेल्या माहितीनुसार सध्या १२ रेल्वे गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. तर २ रेल्वे ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सध्या हा मार्ग बचाव कार्य पूर्ण झाल्यावक ब्लॉक करण्यात आलाय.

रेल्वेकडून हेल्पलाइन नंबर जारी –

जोधपूर: 0291- 2654979(1072), 0291- 2654993(1072), 0291- 2624125, 0291- 2431646
पाली मारवाड: 0293- 2250324, 0293- 2250138, 0293- 2251072

हे ही वाचा:

मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी, इंग्लंडचा हा गोलंदाज करणार संघात पुनरागमन

मराठवाड्याची तोफ थंडावली, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन

कर्नाटकात स्वबळावर विधानसभा लढवून भाजप पुन्हा सरकार बनवेल, अमित शहांची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss