spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रतन टाटा यांचे निकटवर्तीय R. K. Krishna Kumar यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

रतन टाटा (Ratan Tata) यांचे निकटवर्तीय आणि टाटा समूहाचे दिग्गज आर. के. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांचं रविवारी संध्याकाळी मुंबईत निधन झालं.

R. K. Krishna Kumar Passes Away : रतन टाटा (Ratan Tata) यांचे निकटवर्तीय आणि टाटा समूहाचे दिग्गज आर. के. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांचं रविवारी संध्याकाळी मुंबईत निधन झालं. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे. केरळमध्ये जन्मलेल्या कृष्णकुमार यांनी टाटा समूहात (Tata Group) अनेक महत्त्वाची पदं भूषवली. ते इंडियन हॉटेल्सचे प्रमुखही होते. कृष्णकुमार यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) दुपारी साडेचार वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आर. के. टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित कृष्ण कुमार यांना रविवारी मुंबईतील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचा मृत्यू झाला.

आपला मित्र आणि सहकाऱ्याच्या निधनाचं रतन टाटा यांना अतिव दुःख झालं असून कृष्णकुमार यांच्या निधनावर त्यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या सहकाऱ्याची आठवणींना उजाळा देत रतन टाटा म्हणाले की, “माझे मित्र आणि सहकारी आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनानं मला जे दुःख झालंय, त्याचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे. टाटा समूहात आणि वैयक्तिकरित्या काम करताना आम्ही जे सौहार्दपूर्ण संबंध जपले होते, ते कायम स्मरणात राहतील.”

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही कृष्णकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, थलासेरीमध्ये जन्मलेल्या कृष्णकुमार यांनी दक्षिणेकडील राज्यांशी टाटा समूहाचे संबंध मजबूत करण्यात मदत केली, असं म्हणत पिनराई विजयन यांनी आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, कृष्णकुमार निवृत्तीनंतरही टाटा ट्रस्टमध्ये कार्यरत होते.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी टाटा ट्रस्टचे सदस्य आणि कंपनीचे माजी संचालक आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी कृष्णकुमार यांच्या टाटा समूहातील महत्त्वपूर्ण योगदानाचं स्मरण केलं आणि शोक व्यक्त केला. चंद्रशेखरन यांनी कृष्णकुमार यांच्या निधनाबाबत बोलताना म्हटलं की, “पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले कृष्णकुमार यांना रविवारी मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. मला त्यांच्यासोबत काम करण्याचं सौभाग्य मिळालं. ते उत्तम व्यक्ती होते. त्यांच्यात सहानुभूतीची खोल भावना होती. ते नेहमी मदतीसाठी तत्पर असायचे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. ते कायम स्मरणात राहतील.”

हे ही वाचा:

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

राशी भविष्य, २ जानेवारी २०२३ , कर्क राशीच्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss