spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विकृत बोलून वाद निर्माण करणं जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही, अजित पवारांच्या वक्तव्यावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे विधान केलं, त्यासंबंधित कोणता संदर्भ दिला ते मला नाही माहित. पण अजितदादा जे बोलले ते अर्धसत्य आहे.

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ते धर्मवीर नव्हते अशा आशयाचे एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावर माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी छत्रपती म्हणाले,”राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे विधान केलं, त्यासंबंधित कोणता संदर्भ दिला ते मला नाही माहित. पण अजितदादा जे बोलले ते अर्धसत्य आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते पण त्याचबरोबर ते धर्मवीर ही होते. त्याबाबतचे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत”,असं संभाजी छत्रपती यांनी म्हंटले आहे.

यापुढे बोलताना ते म्हणले,” छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज उभं केलं, त्यापुढे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी हिंदवी स्वराज्याच संरक्षण केलं. याबद्दल दुमत नाही. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराजाचे रक्षण केलंच पण त्याचबरोबर त्यांनी धर्माचे देखील रक्षण केले, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज रक्षक आहेत पण त्याचबरोबर ते धर्मरक्षक देखील आहेत, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नये”, अशी संभाजी छत्रपतींनी सांगितले आहे.

“छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत. त्याचबरोबर धर्माचे रक्षक देखील आहेत. संभाजी महाराज हे धर्मवीर असल्याचे अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन हे विधान केलं हे त्यांनीच सांगावं”, असं आव्हान संभाजी छत्रपती यांनी अजित पवारांना केलं आहे.

अजित पवारांनी जे विधान केलं ते अर्धसत्य आहे. अजित पवार छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज रक्षक बोलले ते बरोबर आहे. पण संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, हे विधान साफ चुकीचं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आणि स्वराज रक्षक होते, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यापुढे त्यांनी सर्व पुढाऱ्यांना उद्देशून म्हंटल,” सभागृहात जे बोलतात त्याला अधिकृतपणा येतो. हाऊसच्या बाहेर काहीही बोललं जात, पण हाऊसमध्ये बोलताना गोष्टीचा पूर्ण अभ्यास करूनच बोलावं लागत. मग तो कोणताही विषय असो. माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती आहे कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका. इतिहासकारांनी जे मांडलं ते वाचलं पाहिजे. आपल्याकडे मोठा इतिहास आहे. तुम्ही विकृत बोलून जाता. वाद निर्माण करता. हे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही”, असंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाला मी दिवसरात्र मरणाची वाट पहायचो

तुनिशा शर्माच्या आरोपांवर शिझानच्या बहिणींचं प्रतिउत्तर

वाहन विक्रीच्या बाबतीत ‘या’ कंपनीने हुंडाईला मात देत पटकावला दुसरा क्रमांक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss