spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवार यांना धरणवीर पुरस्कार द्या, भाजपाची मागणी

अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महापूरुषांच्या (great men) नावावरून पुष्कळ वाद सुरु असल्याचं दिसून येत. हिवाळी अधिवेशनच्या (Winter session) शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचे मत विधिमंडळात व्यक्त केले होते. त्यावर भाजप आणि शिंदे गटातील (BJP and Shinde group) नेत्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं, विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच सभागृहात असं म्हटलं होत की कुणीही महापुरुषांबद्दल चुकीची विधानं करू नये आणि त्यांनीच असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराज जर धर्मवीर नसतील तर भाजपातर्फे अजित पवारांना ‘धरणवीर’ पुरस्कार देणार असल्याची खरमरीत टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra) मोदींनी घेतलेला नोटबंदीच्या निर्णय हा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याकडे पहिलं पाऊल होतं, या निर्णयानंतर काही सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे काही अडचणी आल्या मात्र तरीही पुन्हा भाजपचं सरकार आलं. याचाच अर्थ जनतेने नोटबंदीचा निर्णय खुल्या दिलाने स्वीकारला. काही लोकांनी निवडणुकीसाठी साठवलेला पैसा त्यांना जाळावा लागला, त्यामुळे त्यांनी वेगळ्या मानसिकतेतून काही लोकांना न्यायालयात पाठवले. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या विषयावर पडदा पडेल आणि विरोधकांना नवीन मुद्दा शोधण्याची गरज असल्याचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले.

हे ही वाचा : 

एसआयटी चौकशी करा किंवा कोणतीही यंत्रणा बसवा…,एकनाथ खडसेंची चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

विजयस्तंभ भीमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा, अरुण कदम यांची पोस्ट चर्चेत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss