spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : महाराष्टातील सर्वात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस यांना नवं वर्ष कसं जाणार ? पंडित राजकुमार शर्मा म्हणाले…

नवीन वर्ष राज्यातील राजकारणांसाठी कसं जाणार याची उत्सूकता अनेकांना असते. कधी राजकीय गोष्टी तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे राजकारणी कायमच चर्चेत असतात.

Exclusive : नवीन वर्ष राज्यातील राजकारणांसाठी कसं जाणार याची उत्सूकता अनेकांना असते. कधी राजकीय गोष्टी तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे राजकारणी कायमच चर्चेत असतात. तर आज महाराष्ट्रातील सर्वात बुद्धिमान, ताकदवान असलेला अभ्यासू नेता म्हणजेच माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना २०२३ हे वर्ष कसं जाणार आहे हे जाणून घेणार आहोत. तसेच यांचं वैयक्तिक आयुष्य असो की राजकीय जीवन असो, ते कायमच चर्चेत असतं. आणि अनेक जण आपपल्या पद्धतीने या गोष्टींचे तर्कवितर्क हि लावतात. याच संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ ने देशातील ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा (Pandit Rajkumar Sharma, senior astrologer of the country) यांची मुलाखत (interview) घेतली आहे. ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टी कुंडलीनुसार उलगडून सांगितल्या आहेत.

हे ही वाचा: Exclusive : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? पंडित राजकुमार शर्मा म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना २०२३ हे वर्ष कसं जाणार या बद्दल विचारले असता पंडित राजकुमार शर्मा म्हणाले आहेत कि, राजकीय नेते मंडळी ज्या काही राजकीय चुका करतात ते त्यांच्या ग्रहदशा करून घेतात, स्वतः करत नाहीत. २०१९ मध्ये देवंद्र फडणवीस यांनी १०८ विधायक आणले पण तरीही ते मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. कारण त्यांच्या राशीत केतूची महादशा होती. २३ फेब्रुवारी २०२३ नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीत राज योग्य सुरु होत आहे असा मोठा खुलासा देखील पंडित राजकुमार शर्मा यांनी केला आहे. पण यामध्ये १२ एप्रिल पर्यंत जर एकनाथ शिंदेनी सर्व निर्णय जर विचारपूर्वक घेतले तर अजून वर्षभर हे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर असतील.

तसेच पंडित राजकुमार शर्मा यांनी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. ते म्हणाले आहेत कि, कितीही विश्वासाचा माणूस असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या आजूबाजूचे असर्णारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक तुमचे शत्रू असतील. तुम्ही तुमच्या मनाची गोष्ट ऐका. इतर कोणाचीही गोष्ट हि ऐकू नका. तसेच ते पुढे म्हणाले आहेत कि एकनाथ शिंदे सारखा विश्वासू व्यक्ती तुमच्या जोडी आहे त्यामुळे हि तुमची युती महाराष्ट्रासाठी एक उत्तम उदाहरण असेल. त्यामुळे तुम्ही कोणाचं ऐकू नका. जर तुम्ही कोणाचं ऐकलं तर तुम्ही एकमेकांवर शिंतोडे देखील उडवू शकतात.

 

हे ही वाचा:

Exclusive : पंडित राजकुमार शर्मानी केली भविष्यवाणी, आदित्य ठाकरे बनणार नवीन हिरो!

Exclusive : २०२३ हे वर्ष मुख्यमंत्री शिंदेंना कसे जाणार?; पंडित राजकुमार शर्मा म्हणाले, १० – १५ लोक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss