spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांच्या नंतर जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात

अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर (Savarkar and Golwalkar) चुकले आहेत. त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा सवाल करीत शिवपुत्र संभाजी राजे (Shivaputra Sambhaji Raje) यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणार्‍यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजितदादांवर टीका करणार्‍यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी दिले. तसेच, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळं शांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही ते म्हणाले.

‘संभाजी महाराजांचे डोळे फोडले (Eyes widened ) त्याठिकाणी विष्णूचं मंदीर होतं, ते औरंगजेबाने (Aurangzeb) तोडलं नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदीर तोडलं असतं ना,’ असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं. या विधानामुळे वाद होईल हे लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी लगेचच पत्रकारांना बोलावून पुन्हा प्रतिक्रिया देत औरंगजेब क्रूर होता, अशी सारवासारव केली, पण ही सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक चूक केली. औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. औरंगजेबाचा मृत्यू नगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झाला होता, पण औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगाबादमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला होता. दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूबाबत आपण चुकीची माहिती दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केलं आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं, ज्यात ते औरंगजेब क्रूर होता, असं म्हणत आहेत. ‘औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासात लिहून ठेवलं आहे. त्याने भावाला, वडिलांना मारलं आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होता. स्वत:च्या राज्य रचनेकरता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता, पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही,’ असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

हे ही वाचा : 

मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा एकही उद्देश सफल झालेला नाही!, अतुल लोंढेचे वक्तव्य

बॉक्स ऑफिसला लागले ‘वेड’! विकेंड सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समावेश

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss