spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदेगट ही एक टोळी आहे आणि टोळीला अस्तित्व नसतं, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

शिंदेगटाच्या नेत्यांमध्ये जराही स्वाभिमान राहिला नाहीये. त्यांच्यातील शिवसैनिक मेला आहे. शिंदेगट भाजपामध्ये विलीन झाला आहे, अशा कठोर शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली आहे

राज्यतील सत्तांतरानंतर शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन भाग झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत व एकमेकांवर बेछूट टीका करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदेगटाच्या नेत्यांमध्ये जराही स्वाभिमान राहिला नाहीये. त्यांच्यातील शिवसैनिक मेला आहे. शिंदेगट भाजपामध्ये विलीन झाला आहे, अशा कठोर शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली आहे.

शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. राऊत म्हणाले,”शिंदे गट ही एक टोळी आहे. आणि टोळीला अस्तित्व नसतं. टोळी ही गॅंगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. मुंबईतील गॅंगवॉरचा इतिहास सगळ्यांना माहित आहे.टोळी नाहीशी होते. त्यांचं अस्तित्व राहत नाही. शिंदे गट ही टोळी आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

त्यापुढे त्यांनी म्हटलं आहे,”शिंद गटातील नेत्यांमध्ये स्वाभिमान राहिला नाहीये. त्यांच्यामधील शिवसैनिक मेला आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपाची युती करायची होती हे मान्य आहे. पण आता शिंदे गट स्वःताला भाजपमध्ये विनील करत आहे. या उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे ती महाराष्ट्रासाठी,इथल्या प्रश्नांसाठी आणि हिंदुत्वासाठी लढत आहे. आणि यापुढे देखील लढत राहील,”असं राऊतांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी यांच्यावर जे वादग्रस्त विधान केलं होत त्यावर देखील भाजपाला सवाल केला. राऊत म्हणाले,” शिवरायांचा अपमान हा सर्वात मोठा अपमान आहे. महाराष्ट्र आणि देशाचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरु होतो आणि त्यांच्या तिथेच संपतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं विधान भाजपाला मान्य आहे का? हे भाजपने स्पष्ट करावं. इतर राज्यांना भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे. राज्यपाल कोश्यारी यांना जर तो इतिहास मान्य नसेल तर विरोधीपक्षाने राज्यपाल कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपने उत्तर द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाचा मुद्दा अर्धवट ठेऊन इतर मुद्यांकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं राऊत यांनी म्हंटल आहे.

हे ही वाचा:

कपड्यांमुळे चित्रा वाघ यांच्या निशाणावर असलेली Uorfi Javed नक्की आहे तरी कोण ?

पिंपरी-चिंचवडचे प्रभावी नेतृत्व काळाच्या पडद्या आड, आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

MHADA Lottery 2023 : खुशखबर! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं, ५ जानेवारीपासून नोंदणी सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss