spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवीन वर्षाची पहिली लढत होणार आज, भारत श्रीलंकेमध्ये पहिली T-20

IND vs SL : काही दिवसांपूर्वीच आपण २०२२ वर्षाला निरोप दिला आणि नवीन २०२३ वर्षात पदार्पण केलं. हा वर्ष भारत क्रिकेट संघाला (India Cricket Team) सुद्धा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच ३ जानेवारी २०२३ ला मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध अश्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कॅप्टन असणार आहे. तर संघामध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलसारख्या (KL Rahul) सिनियर खेळाडूंना आरामदेण्यात आला आहे. यासोबतच हार्दिक पंड्या टी-२० संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपल्या डावाची दमदार सुरुवात करून ‘मिशन २०२४’ साठी मजबूत पाया घालण्याचा प्रयत्न करेल.

आज श्रीलंकेचा संघ टी-२० विश्वचषकानंतर पहिली टी-२० मालिका खेळणार आहे.या सामन्यासाठी श्रीलंका संघ पूर्ण तयारीने मैदानात उतरला आहे. पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सलामीची जोडी म्हणून इशान किशनसोबत (Ishan Kishan) ऋतुराज गायकवाडला (Rituraj Gaikwad) संधी दिली जाऊ शकते. इशानने यापूर्वी बांगलादेश विरुद्ध (Bangladesh) द्विशतक झळकावले होते. ऋतुराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आतापर्यंत आपली छाप सोडू शकलेला नाही. अशा स्थितीत त्याला मालिकेत स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.

आजच्या सामन्यांमध्ये अनेक सिनियर खेळाडूंना आराम दिला आहे नवी खेळाडूंना मोठया प्रमाणत संधी दिली आहे. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या दोन्ही खेळाडूंवर बसिसिआय ची तगडी नजर असणार आहे. भारत संघाबद्दल बोलायचे झाल्यास नुकत्याच कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात ईशान किशनसह ऋतुराज गायकवाड सलामीला उतरेल. ऋषभ पंतने (Rishabh Pant) न्यूझीलंडमध्ये इशान किशनसह डावाची सुरुवात केली होती. आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा : 

शिंदेगट ही एक टोळी आहे आणि टोळीला अस्तित्व नसतं, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

कपड्यांमुळे चित्रा वाघ यांच्या निशाणावर असलेली Uorfi Javed नक्की आहे तरी कोण ?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss