spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Makar Sankranti 2023, मकर संक्रातीला काळे कपडे का घालतात ?

२०२३ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. जानेवारी महिना सुरु झाला कि अनेकांना तिळाचे लाडू खाण्याची ईच्छा होते म्हणजेच मकरसंक्रांती या सणाचे वेध लागतात.

२०२३ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. जानेवारी महिना सुरु झाला कि अनेकांना तिळाचे लाडू खाण्याची ईच्छा होते म्हणजेच मकरसंक्रांती या सणाचे वेध लागतात. जानेवारी महिन्यातील हा पहिला सण असतो. यंदाच्या वर्षी मकर संक्रांत हि १४ जानेवारीला साजरी करायची कि १५ जानेवारी असा प्रश्न अनेकांना होता. पण पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत हि १५ जानेवारीला साजरी करायची आहे. मकर संक्रांतीमधील, ‘मकर’ हा शब्द ‘मकर राशीचे’ प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळाचे वाटप करतात. त्याचसोबत अनेक गोष्टी दान देखील करतात. पण संक्रांतीला काळे कपडेच का घालतात ? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. म्हणून आज या बातमीमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पूर्वीच्या काली काळा रंग घातला कि तो शुभ कि अशुभ यावरून अनेक तर्कवितर्क हे लावले जातात. पण आताच्या युगात कला रंग हा प्रत्येक जण आवडीने परिधान करतात. जणू काही कला रंगाचा ट्रेण्डच सुरु असतो. तसेच मकर संक्रांतीला देखील आवर्जून काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात. तसेच संक्रांत या सणाला तर काळया रंगाच्या कपडे हे विशेष महत्वाचे असतात. महिलावर्ग काळ्या रंगाच्या सद्य घालून नटतात तर त्याचबरोबर पुरुष देखील काळ्या रंगाचे कुर्ता पायजमा परिधान करतात.

काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेतात. आणि शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसांत तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात. वर्षभरात कुणाशी मतभेद, भांडणे झाली असतील, अबोला धरला गेला असेल; तर त्यांनाही तिळगूळ देऊन हितसंबंध सुधारावेत असं देखील म्हंटले जाते. तसेच काळया साडया, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान केल्याने आपल्या घरात सुख-शांती नांदते अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर या दिवशी गूळ आणि तीळ दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि शनीच्या स्थितीपासून शांती मिळते. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान केल्याने देखील शुभ लाभ मिळतो. या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले तूप दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नपूर्णा दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. शनिदेवाची साडेसाती प्रभावित झालेल्या लोकांनी तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून ते एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे.

हे ही वाचा:

Urfi Javed चे चित्रा वाघ यांना आव्हान, मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss