spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठरलं तर मग ! शिवशक्ती आणि भीमशक्ती येणार एकत्र

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा विरोध आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतर झाल्यापासून महाराष्ट्रात अनेक नवीन राजकीय पैलू (Political aspect) उघडताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येणार का? अशा चर्चा रंगताना पहायला मिळत होत्या. मात्र आता, त्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. लवकरच शिवशक्ती (Shiva Shakti) आणि भीमशक्ती (Bhimashakti) एकत्र (together) येणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Alliance) सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) तील इतर पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे पुढे चर्चा होत नसल्याचे समजते आहे.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. तेव्हा पासूनच या दोन शक्ती येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या महानगरपालिकेच्या (Municipal Corporations) निवडणुका (Election) उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) आणि प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Alliance) यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. परंतु, महाविकास आघाडीमधील इतर पक्षांचा याला विरोध आहे. काँग्रेस (Congress)आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोबत घेण्याचे उद्धव ठाकरे प्रयन्त करणार आहेत. पण राष्ट्रवादी यासाठी विरोध करत आहे आणि काँग्रेसचा देखील छुपा विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

याआधी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या गोष्टीच्या चर्चा रंगात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात विधानं केली आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जाण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे बोललं जातंय. त्याचबरोबर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याची घोषणा करताना देखील प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले,” गरीब मराठा सत्तेत यावा असं राष्ट्रवादीला वाटत नसेल म्हणून ते विरोध करत असतील पण उद्धव ठाकरे आणि आमचा निर्णय झाला आहे. आम्हाला फक्त तो जाहीर करायचा आहे.”असं स्पष्टीकरण त्यांनी दिल आहे.

हे ही वाचा:

Lakadbaggha चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज, ८ वर्षांनंतर मिलिंद सोमण यांचे सिनेविश्वात पुनर्पदार्पण

कपिल देव यांचं मोठं विधान, रोहित शर्मा आणि विराट कोहली एकटे विश्वचषक जिंकणार नाहीत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल धक्कादायक बातमी! आता १४ वर्षांनंतर दिग्दर्शकानेही सोडला शो, कारण वाचून वाटेल आश्चर्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss