spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिव ठाकरेची सोशल मीडियावर हवा!, म्हणतो स्वप्न…

शिवने पाहिलांदा रोडिस रायसिंग (roadies rising) या एमटीव्ही (MTV Roadies) रिऍलिटी शो मध्ये दिसला होता. रोडिसमध्ये तो स्पर्धक म्हणून आला होता. रोडिस राईसिंगमध्ये तो सेमी फायनलपर्यंत पोहोचला.

शिवने पाहिलांदा रोडिस रायसिंग (roadies rising) या एमटीव्ही (MTV Roadies) रिऍलिटी शो मध्ये दिसला होता. रोडिसमध्ये तो स्पर्धक म्हणून आला होता. रोडिस राईसिंगमध्ये तो सेमी फायनलपर्यंत पोहोचला. शिव एवढ्यावर थांबला नाही. त्यानंतर तो बिग बॉस मराठीच्या २ पर्वातील कन्टेस्टंटन्ट होता. बिग बॉस मधील त्याची खेळाडू वृत्ती हि प्रेक्षकांना आवडली. बिग बॉस (big boss) पर्व २ चा शिव विजेता (winner) हि झाला. बिग बॉस नंतर त्याला बरेच नाव लवकीक झाले. प्रसिद्ध रिऍलिटी शो चा चेहेरा म्हणून तो पुढे आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव (shiv thakre) सध्या बिग बॉस हिंदी या सलमान खानच्या (salman khan) शो मधील १६ पर्वात स्पर्धक म्हणून खेळात आहे. तिथेही तो चतुराईने आणि बुद्धीने खेळतोय. लोकांना त्याच चतुराईचं वागणं आवडतंय. अशातच शिवणे सोशल मीडिया वरील इंस्टाग्रामवर १ मिलियन (१million ) फोल्लोवर्स चा टप्पा पार केला आहे. १ मिलियन फोल्लोअर झाल्याने शिवने त्यांना धन्यवाद म्हण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘पोस्ट मध्ये शिव म्हणतो कि स्वप्न बघणं हे सोप्प आहे. पण ती पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही जर मेहेनती असाल आणि लोक तुमच्या सोबतीला असतील तर तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील’. पुढे तो म्हणतो ‘मी खूप नशीबवान आहे कि तुमच्या सारखे प्रेमळ लोक माझ्या सोबतीला आहेत. तुमचं प्रेम कायम असाच राहुद्यात. खूप खूप धन्यवाद’. असे म्हणून शिवने सोशल मीडियावर लोकांचे आभार मानले आहेत. शिवच्या या पोस्टवर चाहते तसेच सेलेब्रिटीनी (celebrity) त्याला शुभेच्छा दिल्या. एका सेलिब्रिटी ने म्हटलंय स्वप्न साकार होतात याच तू उदाहरण आहेस. खूप शुभेच्छा शिव

शिव मूळचा अमरावतीचा आहे. शिवने आपले शिक्षण महाराष्ट्रातील अमरावती येथील संत कवाराम विद्यालयातून केले. त्यांनी नागपुरातील जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून अभियांत्रिकी केली. शिवला लहानपानापासूनच नृत्याची खूप आवड होती. शिव मध्यम वर्गीय असल्यामुळे त्याला फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही त्याने हिम्मत सोडली नाही. आणि आज त्याची एक एक स्वप्न पूर्ण होतायत. शिवच्या नवीन सुरवात छान झाली आहे असे शिव म्हणतो.

हे ही वाचा:

T20 पदार्पणात शुभमन गिलची निराशाजनक कामगिरी, चाहते झाले नाराज म्हणाले – ‘भाई तू टेस्ट खेल’

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याला सुरुवात, नाणेफेक जिंकत श्रीलंकेने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss