spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Makar Sankranti 2023, मकर संक्रातीला तीळ आणि गूळ का खातात ?

यंदाच्या वृष्टी मकर संक्रांति हा सण १५ जानेवारी २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीमधील, ‘मकर’ हा शब्द ‘मकर राशीचे’ प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण.

Makar Sankranti 2023  :  यंदाच्या वृष्टी मकर संक्रांति हा सण १५ जानेवारी २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीमधील, ‘मकर’ हा शब्द ‘मकर राशीचे’ प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण. मकरसंक्रांतीच्या दिवशी काली कपडे परिधान केले जातात. त्याचसोबत अनेक गोष्टी दान देखील करतात. आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळाचे देखील वाटप केले जाते. परंतु मकर संक्रांतीला तिळाच्या लाडूचे सेवन का करतात ? इतर तिळाचे किंवा तिळाच्या पदार्थांचे कमी सेवन करतो पण मकर संक्रांत जस जशी जवळ येते तसतसे आपल्याला तिळाचे लाडू खाण्याची उच्च हि होऊ लागते. पण तुम्हाला माहित आहे का थंडीत किंवा संक्रांतीला तिळाचे लाडू का खातात ? तर याचेच कारण आज आम्ही सांगणार आहोत.

  • तीळ हे उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर हा केला जातो. आणि मकर संक्रात हि हिवाळ्याच्या कालावधीत येते त्यामुळे मकर संक्रांत या सणाला तिळाचे फार जास्त महत्व आहे.
  • तिळात फायबर आणि मॅग्नेशिअम असते आणि हे घाट इंन्सुलीन आणि ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असतात.
  • तसेच तिळात कॅल्शियम मँगनीज तर आहेच पण त्याचसोबत त्यात लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मोठ्या प्रमाणत मदत करते.
  • तिळाचा समावेश आहारात केल्यास रक्तदाबाशी निगडीत असलेल्या समस्या दूर होतात. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यासाठी सुद्धा तीळ हे फायदेशीर असतात.
  • तीळ खाल्याने आपण खाल्लेलं अन्न पचन होण्यास मदत होते.
  • मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा काळ्या तीळाने केली जाते. यासोबतच काळी मसूर, तांदूळ, तूप, मीठ, गूळ आणि काळे तीळ दान केले जातात.
  • असे मानले जाते की सूर्यदेव आणि शनिदेव या दोघांची कृपा प्राप्त होण्यासाठी काळे तीळ आणि गुळाचे लाडू खातात
  • तीळ हे पचायला जड असतात म्हणून थंडीमध्ये भूक भागविण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.
  • थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले असते.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, मकर संक्रातीला काळे कपडे का घालतात ?

Makar Sankranti 2023, यंदाच्या वर्षी मकर संक्रांत १४ ला आहे कि १५ जानेवारीला ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss